ऑस्ट्रेलियन संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नेथन लायन याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. नेथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो दिग्गज गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याचा विश्वास आहे की, नेथन लायन कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेऊन शेन वॉर्न याच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.
नेथन लायन (Nathan Lyon) याने पर्थ कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या आणि यादरम्यान त्याने 500 विकेट्सचा आकडा गाठला. आता नेथन लायन हा कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज ठरला आहे. लायनने 123 कसोटी सामन्यांच्या 230 डावात 500 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 496 विकेट्स होत्या.
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नेथन लायनचे कौतुक केले आणि म्हणाला की, “तो कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स देखील पूर्ण करू शकतो. तो आणखी किमान चार-पाच वर्षे खेळू शकतो. दरवर्षी 10 सामने होतात. यासह तो आणखी 40-50 कसोटी सामने खेळू शकेल. जर त्याने एका सामन्यात चार-पाच विकेट घेतल्या तर त्याच्या 700 विकेट्स पूर्ण होतील.”
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या नावावर आहे. त्याने 133 कसोटी सामन्यांच्या 230 डावात 800 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर शेन वॉर्न (Shane Warne) याचा क्रमांक लागतो ज्याने 708 विकेट्स घेतल्या. भारताच्या अनिल कुंबळे (Anil Kumble) याने 619 तर जेम्स अँडरसन (James Anderson) याने 600 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. दिवंगत शेन वॉर्नने 2019 ऍशेस मालिकेदरम्यान भाकित केले होते की, लायन कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेऊ शकेल. (Australian captain’s eye-catching statement about Nathan Lyon Said That’s Shane Warne’s record)
हेही वाचा
साई सुदर्शनची आंतरराष्ट्रीय पदार्पणावर भावनिक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘देशासाठी खेळून…’
‘रोहितचा भावनिकरीत्या विचार करू नका, MIचा निर्णय योग्यच, पंड्याने स्वत:ला सिद्ध केलंय’, पाहा कुणी केलंय भाष्य