पितृसत्ताक व्यवस्था… एक अशी सामाजिक सामाजिक व्यवस्था जिथे महिलांना पुरुषांपेक्षा कमी दर्जाची वागणूक दिली जाते. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक असे सर्व प्रकारचे निर्णय पुरुषांच्या हाती असतात.
एक काळ असा होता, जेव्हा फक्त भारत देशातच नव्हे तर पूर्ण जगात पितृसत्ताक व्यवस्था होती. पण वेळेनुसार ही व्यवस्था मोडकळीस आली आणि महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊ लागल्या. २१व्या शतकातील स्त्री तर कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. राजकारण, व्यवसाय, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांसह महिलांनी क्रिडा क्षेत्रातही झेप घेतली आहे.
जर क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर, हर्षा भोगले, आकाश चोप्रा, संजय मांजरेकर अशा भारतीय समालोचकांची ख्याती जगभर पसरलेली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून मैदानावर खेळण्यापासून ते समालोचनापर्यंत, महिलाही त्यांचा सहभाग नोंदवताना दिसत आहेत. आयपीएल, विश्वचषक व ऍशेस सिरीजसारख्या मोठ-मोठ्या टूर्नामेंटमध्ये ईसा गुहा, लिसा स्टॉकर, चार्लोट एडवर्ड्स अशा कित्येक महिला कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसल्या आहेत.
अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध महिला समालोचक नेरोली मिडोज हिची आयपीएल २०२०साठी पहिल्यांदा समालोचकांच्या पॅनलमध्ये निवड झाली होती.
पण जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये या ऑस्ट्रेलियन महिला समालोचक नेरोली मिडोजला नक्की का संधी देण्यात आली असावी? ती नक्की आहे तरी कोण? याची सर्वांना उत्सुकता लागली असेल. चला तर जाणून घेऊया, कोण आहे ही नेरोली मिडोज…
१६ सप्टेंबर १९८५ रोजी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कॉली शहरातील मिडोज कुटुंबात एक गोंडस अशी मुलगी जन्माला आली. तिचे नाव होते ‘नेरोली मिडोज’. नेरोली ही तिच्या कुटुंबातील सर्वात लहानी मुलगी. तिला रॉस मिडोज नावाचा सर्वात मोठा भाऊ आहे, जो ऑस्ट्रेलियन हॉकीपटू आहे. तर दूसरा भाऊ आयन मिडोज हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आणि लेखक आहे. या २ मोठ्या भावानंतर जन्मलेल्या नेरोलीला पत्रकारिता क्षेत्रात खूप रुची होती. त्यामुळे तिने ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठातून पत्रकारितेची शिक्षण पूर्ण केले.
२००२ साली नेरोलीच्या पत्रकारिता कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. महत्त्वाचे म्हणजे, तिने क्रिडा क्षेत्राचा रस्ता स्विकारला. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. तिची कडी मेहनत, हजरबाबीपणा, अतिशय रोमांचक प्रश्न विचारण्याची शैली यांमुळे तिला क्रिडा क्षेत्रात भरभरुन यश मिळत गेले. सेव्हन नेटवर्क, नेटवर्क १०, इएसपीएन ऑस्ट्रेलिया अशा मोठ-मोठ्या क्रिडा न्यूज टिव्ही चॅनलमध्ये तिला संधी मिळत गेली.
वेळेनुसार नेरोलीच्या क्रिडा क्षेत्रातील अनुभवात वाढ होत गेली आणि केवळ ऑस्ट्रेलियामध्ये नव्हे तर पूर्ण क्रिकेटविश्वात एक हाय-प्रोफाइल क्रीडा पत्रकार आणि समालोचक म्हणून तिला ओळखले जाऊ लागले.
गेल्या १० वर्षात नेरोलीने क्रिकेटसह फुटबॉल, टेनिस, रग्बी आणि बास्केटबॉल अशा क्रिडा प्रकारात समालोचन केले आहे. गतवर्षीपर्यंत ती युनायटेड स्टेट्सच्या प्रसिद्ध फॉक्स स्पोर्ट्स चॅनलसाठी काम करत होती. पण काही कारणामुळे तिला तिथून काढून टाकण्यात आले. यावर प्रसिद्ध क्रिकेट लेखक लेलोर यांनी आश्चर्य व्यक्त म्हटले होते की, “मी नेरोलीला गेल्या १० वर्षांपेक्षाही जास्त काळ क्रिकेट क्षेत्रात काम करताना पाहिले आहे. ती क्रिडा पत्रकार आणि समालोचन या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहे. ती कडी मेहनत करणारी आणि अतिशय रोमांचक प्रश्न विचणारी प्रेजेंटर आहे. तिचा क्रिकेट आणि फुटबॉलचा गाढा अभ्यास आहे.”
क्रिकेटवेड्या भारत देशातही नेरोलीचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. अक्षरश: गेल्या १० वर्षांपासून भारतीय चाहते बीसीसीआयकडे नेरोलीची आयपीएलमध्ये समालोचन करण्यासाठी नेमणूक करण्याची विनंती करत होते. बीसीसीआयने चाहत्यांच्या या विनंतीला मान देत यावर्षी नेरोलीला संधी दिली होती. ती गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत (युएई) खेळवण्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ती समालोचन करताना दिसली होती.
याच नेरोलीचा आज ३६वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आयपीएल कमेंटेंटर…!!
ट्रेंडिंग लेख –
तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल