क्रिकेविश्वातून मोठी शोकवार्ता पुढे येत आहे. ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्स याचा शनिवारी (१४ मे) कार अपघातात मृत्यू झाला आहे. तो ४६ वर्षांचा होता. या धक्कादायक वृत्तानंतर क्रिकेटविश्व शोकसागरात बुडाले आहे. वर्षभरात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दिग्गज क्रिकेटपटूला गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. सायमंड्सपूर्वी रॉड मार्श आणि शेन वॉर्न या ऑस्ट्रेलियन दिग्गजांचे निधन झाले आहे.
Tragic news surrounding the former Australia all-rounder and our thoughts are with his friends and family.https://t.co/6eXiz8Mb5O
— ICC (@ICC) May 14, 2022
क्विन्सलँड पोलिसांच्या वक्तव्यानुसार, सायमंड्सचा अपघात एलिस नदी पुलाजवळील हर्वे रेंज रोडवर झाला आहे. यावेळी तो कारमध्ये एकटाच होता. रस्त्यावरून त्याची कार घसरली आणि पलटी झाली. त्याला आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांकडून वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्याला झालेल्या दुखापतींमुळे त्याचे निधन झाले.
सायमंड्स हा ऑस्ट्रेलियाचा २०१० च्या दशकातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. तो २००३ आणि २००७ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियान संघाचा भाग देखील होता. त्याने २००३ विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध १४३ धावांची खेळी केली होती. तसेच अंतिम सामन्यात भारताच्या दिनेश मोंगिया आणि हरभजन सिंग यांना बाद केले होते.
त्याने त्याच्या कारकिर्दीत २६ कसोटी सामने खेळले असून १४६२ धावा केल्या, तसेच २४ विकेट्स घेतल्या. त्याने १९८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०८८ धावा केल्या असून १३३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले, ज्यात त्याने ३३७ धावा केल्या आणि ८ विकेट्स घेतल्या. दरम्यान, त्याच्या कारकिर्दीत अनेक वादही झाली, ज्यामुळे असे म्हणले जाते की, त्याची कारकिर्द अवेळी संपुष्टात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
आंद्रे रसेलच्या ‘वादळा’पुढे सनरायझर्स हैदराबाद उडाले, ऐतिहासिक कामगिरी करत पोलार्ड-गेलला मागे सोडले
आंद्रे रसेलचा हैदराबादविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, कोलकाताने ५४ धावांनी जिंकली रोमांचक लढत
शशांकने अडवला रहाणेचा सिक्स, बाउंड्री लाईनवर घेतला अनपेक्षित झेल; पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारा कॅच