सध्याच्या घडीच्या दिग्गज खेळाडूंमध्ये सामील असलेल्या ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्यासाठी लीड्स कसोटी सामना खास ठरणार आहे. ऍशेस मालिका 2023मधील तिसरा कसोटी सामना 6 जुलैपासून लीड्स येथे खेळला जाणार आहे. हा स्मिथच्या कसोटी कारकीर्दीतील 100वा कसोटी सामना असणार आहे. अशात स्मिथचा हा सामना आणखी खास बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या काही खेळाडूंसोबत मिळून एक व्हिडिओ तयार केला आहे, ज्यात त्या सर्व खेळाडूंना स्मिथच्या सर्वोत्तम खेळीविषयी विचारले आहे.
सर्व खेळाडूंनी एकसुरात ऍशेस मालिका 2019मध्ये (Ashes Series 2019) इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन मैदानातील खेळी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याची सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगितले आहे.
‘क्रिकेटमध्ये त्याच्या पुनरागमनाची खेळी सर्वोत्तम’- ऑस्ट्रेलियन संघ
या व्हिडिओत कर्णधार पॅट कमिन्स याच्यापासून ते उस्मान ख्वाजा, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन आणि नेथन लायन हेदेखील दिसत आहेत. या सर्वांनी स्मिथची एजबॅस्टन येथील खेळी सर्वोत्तम असल्याचे सांगितले. या मैदानावर तो चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता. या सामन्यात स्मिथने दोन्ही डावात शतक झळकावले होते.
ही त्याची सर्वोत्तम खेळी सांगण्यामागे सर्वांनी हेच कारण दिले की, स्मिथने ज्या काळाचा सामना केल्यानंतर पुनरागमन केले. तसेच, ही खेळी साकारली, ते अर्थातच यादगार आणि कौतुकास्पद होते.
कर्णधार कमिन्स आणि लॅब्यूशेन यांनी या खेळीचे वर्णन करत याच्या विशेषतेबद्दल सांगत म्हटले की, “क्रिकेटमधून 1 वर्षांच्या बंदीनंतर अशा खेळीसह पुनरागमन खूपच खास आणि भावूक करणारा क्षण होता.” लॅब्यूशेनने हेही म्हटले की, त्याने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत कोणत्याही खेळाडूसाठी प्रेक्षकांना इतके नकारात्मक पद्धतीने आरडाओरड करताना ऐकले नव्हते. मात्र, स्मिथने सर्वांची बोलती बंद करत या खेळीमधून आपल्या जबरदस्त क्षमतेची ओळख करून दिली.
“I’ve seen him play some good ones”
Ahead of his 100th Test at Headingley this week, we asked Australia’s Test squad to pick the best innings they’d ever seen from Steven Smith … and there was a clear winner ???? #Ashes pic.twitter.com/9UF2RwODta
— cricket.com.au (@cricketcomau) July 3, 2023
खरं तर, सन 2018मध्ये स्टीव्ह स्मिथ याला चेंडूशी छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर 1 वर्षांची बंदी घातली होती. या प्रकरणात त्याच्यासोबत डेविड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांचाही समावेश होता. तिन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात सँड पेपरच्या मदतीने चेंडूशी छेडछाड केली होती. यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली होती. मात्र, स्मिथने आता दमदार पुनरागमन केले असून सर्वत्र त्याची वाहवा होत आहे. अशात आपल्या 100व्या कसोटीत स्मिथ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (australian cricket team players chooses cricketer steve smith best test innings before his 100th test leeds ashes 2023)
महत्वाच्या बातम्या-
‘टी20 विश्वचषकासाठी खेळाडूंना पारखण्याची…’, IPL गाजवणाऱ्या युवा भारतीयाचे विंडीज दौऱ्यापूर्वी मोठे विधान
बापरे! अजित आगरकरला वर्षाकाठी मिळणार ‘एवढे’ कोटी रुपये, BCCIकडून मुख्य निवडकर्त्याच्या पगारात 3 पटींनी वाढ