भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील यंदाच्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेतील पुढील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. ही बॉक्सिंग डे कसोटी असेल जी 26 डिसेंबरपासून सुरू होईल. घरच्या मैदानाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाला येथे खेळणे सोपे जाईल. इतर ठिकाणांप्रमाणे येथेही टीम इंडियासाठी अडचणी असतील. मात्र मागील दोन दोऱ्यांमध्ये भारताने कांगारुंना या ठिकाणी हरवले आहे. त्यामुळे बाजू टीम इंडियाकडे झुकलेली दिसते. चला तर मग जाणून घेऊया मेलबर्नमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाचा कसोटी रेकॉर्ड कसा आहे.
ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट मैदानावर आतापर्यंत 116 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने 67 जिंकले आहेत, तर 32 गमावले आहेत आणि उर्वरित 17 सामने अनिर्णित राहिले आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे तेच मैदान आहे जिथे 1877 मध्ये जगातील पहिला कसोटी सामना खेळला गेला होता.
गेल्या 14 वर्षांत म्हणजे 2010 पासून, ऑस्ट्रेलियाने येथे 14 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये कांगारू संघाने 9 जिंकले, 3 गमावले आणि उर्वरित 2 सामने अनिर्णित राहिले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या 14 वर्षात मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला झालेल्या 3 पराभवांपैकी 2 भारताविरुद्ध झाले आहेत. भारताने 2018 आणि 2020 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. उर्वरित संघाला 2010 मध्ये इंग्लंडविरुद्ध एका पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने गाब्बामध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिस-या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. अश्विनच्या जागी मुंबईचा फिरकी गोलंदाज तनुष कोटियनचा पुढील दोन कसोटींसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. आता अश्या परिस्थितीत तनुषला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा-
कुलदीप, अक्षरच्या आधी तनुष कोटियनचा टीम इंडियात का प्रवेश? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण
चॅम्पियन्स ट्राॅफी पूर्वी इंग्लंडला धक्का! कसोटी कर्णधार बेन स्टोक्स गंभीर दुखापती
रोहित शर्माने दुखापतीबाबत दिला मोठा अपडेट, जाणून घ्या चौथी कसोटी खेळणार की नाही?