---Advertisement---

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा दौरा करणार! जाणून घ्या सविस्तर अपडेट

On: शनिवार, ऑगस्ट 8, 2026 8:14 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Australia cricket team) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे, जी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025-27 च्या चक्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे. सध्या टीम इंडिया श्रीलंकेत आहे, जिथे 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून गाले येथे खेळवला जाईल. दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा जानेवारी 2027 मध्ये होणार आहे, पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 21 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारताने 7 कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी फक्त 1 गमावला आहे आणि 5 मध्ये विजय मिळवला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाईल. हे एक ऐतिहासिक मैदान असून जिथे भारताने 35 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच त्यामध्ये त्यांना 16 सामन्यात विजय मिळाला आहे तसेच 7 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3रा कसोटी सामना गुवाहाटीच्या डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियमवर 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाईल. या मैदानावर गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना झाला होता, ज्यामध्ये भारताचा पराभव झाला होता.

चौथा कसोटी सामना महेंद्रसिंग धोनीच्या रांची शहरात खेळला जाणार असून झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल स्टेडियमवर होणारा हा सामना 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान असेल. या मैदानावर भारताने 3 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 जिंकले आहेत आणि 1 ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनिर्णित (ड्रॉ) राहिला होता.

मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 27 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर भारताने 16 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 10 सामने अनिर्णित (ड्रॉ) राहिले आहेत. भारताने 4 जिंकले आहेत आणि 2 सामन्यात पराभव पत्करला आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमधे भारत पाचव्या स्थानावर आहे. शुबमन गिलच्या (Shubman gill under captaincy) नेतृत्वाखालील संघाने 9 कसोटी सामन्यांपैकी 4 जिंकले असून 4 गमावले आहेत. इंग्लंडविरुद्धचा एक सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिला होता. श्रीलंकेविरुद्ध होणारी आगामी मालिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यातील दोन्ही सामने जिंकून भारत टॉप-4 मध्ये पोहोचू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---