ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना कमालीचा निरस ठरला. पाच दिवसात तीन डावही पूर्ण न झाल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर आता दुसरा सामना उभय संघांमध्ये १२-१६ मार्च दरम्यान लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर(Gadafi Stadium Lahore) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऍलेक्स केरीसह एक मजेदार घटना घडली. ज्याचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने शेअर केला आहे. (Alex Carey Swimming Pool Video)
आणि स्विमिंग पूलमध्ये पडला केरी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सराव सत्र आटपून आपल्या हॉटेलमध्ये परतत होता. त्यावेळी संघाचा यष्टीरक्षक ऍलेक्स केरी हा आपल्या सहकार्यांशी बोलत होता. सर्व खेळाडू स्विमिंग पूलच्या शेजारून जात असताना तो मागे वळून बोलू लागला. मात्र, बोलता-बोलता समोर लक्ष न गेल्याने तो थेट स्विमिंग पूलमध्ये पडला. त्याच्या फजितीचा व्हिडिओ संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/Ca6ax6StLZg/
पहिला सामना झाला रटाळ
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या फलंदाजांनी यथेच्छ फलंदाजी केली. पहिल्या डावात पाकिस्तानसाठी इमाम उल हक व अझर अली यांनी शतके ठोकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने फलंदाजी करताना सलामीवीर उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅब्युशेन व स्टीव स्मिथ यांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला केवळ सात धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इमाम व अब्दुल्ला यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी केल्याने पाचव्या दिवशी सामना अनिर्णित करण्याचा दोन्ही कर्णधारांनी निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडीयाचे असे तीन खेळाडू, ज्यांना संपूर्ण कसोटी कारकिर्दीत शतक करण्यात आले अपयश (mahasports.in)