---Advertisement---

डेविड वॉर्नरने अशी काय चूक केली, ज्यामुळे मागावी लागली रश्मिकाची माफी? पाहा व्हिडिओ

On: सोमवार, नोव्हेंबर 14, 2022 11:55 PM
Rashmika-Mandhana-And-David-Warner
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये सर्वात जास्त सोशल मीडियावर सक्रिय कोण असतं? असा प्रश्न विचारला तर प्रत्येक क्रिकेट चाहता हे छाती ठोकून सांगेल की, डेविड वॉर्नर. कारण, वॉर्नर हा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आघाडीवर असतो. तो दररोज त्याचे नवनवीन व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडिओंमधून त्याचे भारतीय सिनेमा आणि त्यातील गाण्यांवर विशेष प्रेम असल्याचे दिसते. कारण, तो नेहमीच भारतातील कोणत्या ना कोणत्या गाण्यावर किंवा सिनेमातील डायलॉगवर व्हिडिओ बनवून पोस्ट करत असतो. चाहत्यांनाही त्याचे हे व्हिडिओ प्रचंड आवडतात. अशात डेविड वॉर्नरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओत तो एका मुलीच्या अवतारात दिसत आहे.

डेविड वॉर्नर (David Warner) हा असा खेळाडू आहे, जो भारतीय सिनेमांचा मोठा चाहता मानला जातो. अनेकदा तो कलाकारांच्या चेहऱ्यांवर आपला चेहरा लावून गाण्यांवर नाचतो किंवा डायलॉगचे लिप सिंक करताना दिसतो. त्याने मैदानावरही अल्लू अर्जुन याच्या प्रसिद्ध ‘झुकेगा नहीं साला’ या स्टेप्सची नक्कल केली होती. मात्र, यावेळी त्याच्या पोस्टने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे.

खरं तर, वॉर्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने दाक्षिणात्य अभिनेत्री आणि ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्या एका गाण्यावर आपला चेहरा लावला आहे. तसेच, तो मुलगी बनून नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत वॉर्नरने लिहिले आहे की, “यासाठी माफ करा.”

वॉर्नरच्या या व्हिडिओवरील कमेंट पाहिल्या, तर त्याने कमेंटमध्येही लिहिले की, “रश्मिका यासाठी मला माफ कर, पण मला हे करायचे होते.” चाहत्यांना हा व्हिडिओ पाहून त्यांचे हसू आवरता येत नाहीये. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) यानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “कधीच चांगला नाही दिसला.”

चाहतेही त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, “आतापर्यंत आम्हाला वाटायचे की, तुम्ही फक्त पुष्पा 2मध्ये हिरोची जागा घेऊ शकता, पण आता अभिनेत्रीच्या रोलमध्येही तुम्ही एकदम फिट बसाल.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुम्ही यामध्ये खूप सुंदर दिसत आहात. असे वाटत आहे की, तुमचे अकाऊंट तुमची मुलगी चालवत आहे.”

खरं तर, वॉर्नरने यापूर्वीही अशा अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याने यापूर्वी एका साऊथ सिनेमातील डीजे टिल्लूमध्ये हिरोच्या जागी आपला चेहरा लावला होता, पण यावेळी त्याने पहिल्यांदाच कोणत्याही अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आपला चेहरा लावला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात एकही सामना खेळायला मिळाला नाही, पण न्यूझीलंड दौऱ्यावर ‘हे’ 2 खेळाडू करणार पुनरागमन
‘रोहित निर्णय घेत नाही, मैदानावर तोंड लपवण्यासाठी जागा शोधतो’, माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---