टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा संपली असून आता भारतीय क्रिकेट संंघ पुढील मालिकांसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचला आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध आधी टी20 आणि नंतर वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. निवडकर्त्यांनी वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या टी20 संघाचे नेतृत्व करेल, तर शिखर धवन वनडे मालिकेचे नेतृत्व करेल. या दौऱ्यावर भारतीय संघाच्या दोन खेळाडूंवर खास नजर असेल. कारण, त्यांना टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर (India Tour of New Zealand) 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला. भारतीय संघ हा पराभव विसरून आता पुढे गेला आहे. तसेच, भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चहल खेळणार भारताकडून
टी20 विश्वचषकादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. सुपर 12 फेरीतील 5 सामन्यात आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटू म्हणून आर अश्विन याला संधी मिळाली, तर दुसरा फिरकीचा पर्याय म्हणून अक्षर पटेल याला संधी देण्यात आली. न्यूझीलंडमध्ये वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे भारतीय संघाचे फिरकी गोलंदाजांचे पर्याय असतील. आता प्रशिक्षक आणि कर्णधार प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हर्षल पटलेला पुनरागमनाची प्रतीक्षा
टी20 विश्वचषकादरम्यान सराव सामन्यात खेळणाऱ्या हर्षल पटेल (Harshal Patel) याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासोबतच कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. आता न्यूझीलंडमध्ये शमीला विश्रांती दिल्यानंतर हर्षल पटेल याला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (india vs new zealand eyes on harshal patel and spinner yuzvendra chahal in t20 series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रोहित निर्णय घेत नाही, मैदानावर तोंड लपवण्यासाठी जागा शोधतो’, माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया
क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर; अशी आहे यादी