ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा धुव्वाधार फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला माहितीये की, ऑस्ट्रेलियाच्या मजबूत कसोटी संघात स्थान मिळवणे कठीण आहे. तरीही त्याला अपेक्षा आहे की, त्याला भारत दौऱ्यासाठी संघात स्थान मिळेल. 31 वर्षीय पीटरने त्याचा शेवटचा कसोटी सामना जवळपास 4 वर्षांपूर्वी खेळला होता. त्याने 2019मध्ये भारताविरुद्धच शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र, त्यावेळी सिडनीचे मैदान होते. यावेळी त्याला भारताचा दौरा करायचा आहे. त्यासाठी त्याला ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवायचे आहे.
पीटर हँड्सकॉम्ब (Peter Handscomb) ही दावेदारी मैदानावर केलेल्या प्रदर्शनामुळे ठोकत आहे. भारत दौऱ्यात स्थान बनवण्याबद्दल त्याने जे काही वक्तव्य केले आहे, तितकेच त्याने आपल्या बॅटमधूनही सिद्ध केले आहे. पीटर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात आहे. त्याने शेफील्ड शील्डमध्ये 93.66च्या सरासरीने 562 धावा चोपल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पंतप्रधान प्लेइंगकडून खेळताना दोन डावात अर्धशतक झळकावल्या आहेत. मात्र, या कामगिरीनंतरही त्याला चांगलंच माहिती आहे की, त्याचे पुनरागमन सोपे नसणार आहे. तरीही, तो भारत दौऱ्यासाठी अपेक्षा करत आहे.
“मी फक्त धावा करू शकतो”
माध्यमांनी पीटरच्या हवाल्याने सांगितले की, निवडकर्त्यासोबत संवाद साधणे आशादायक राहिले आहे. मात्र, तुम्ही कसोटी संघाकडेही पाहिलं पाहिजे. जिथे असे खेळाडू आहेत, जे माझ्याही पुढे आहेत आणि असे फलंदाज आहेत, जे खूप प्रभावीपणे प्रदर्शनही करत आहेत.
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी कितीही धावा करू शकतो, पण संघात जागापण पाहिजे ना आणि यावेळी मी खूप चांगले क्रिकेट खेळत आहे. एका फलंदाजाच्या रूपात तुम्ही फक्त एवढेच करू शकता की, अधिकाधिक धावा करून आपली दावेदारी ठोकू शकता.”
फेब्रुवारी- मार्चमध्ये होईल ऑस्ट्रेलिया- भारत दौरा
पीटरला फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळण्यासाठी ओळखळे जाते. मात्र, भारत दौऱ्यातील संघात स्थान मिळवण्यासाठी ट्रेविस हेड याच्याशी त्याची स्पर्धा असेल. हेड यावर्षी श्रीलंका आणि पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघाचा भाग राहिला आहे. ऑस्ट्रेलिया संघ 4 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (australian cricketer peter handscomb hopeful of earning ticket in aus test team on india tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
6 डिसेंबरचा जन्म असलेल्या 11 तगड्या क्रिकेटपटूंची ’बर्थडे इलेव्हन’! सहा भारतीयांचा समावेश
पाकिस्तानचा पराभव टीम इंडियाच्या पथ्यावर! WTC फायनलच्या अपेक्षा उंचावल्या; असे आहे समीकरण