---Advertisement---

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहितच्या सलामी जोडीदाराने वाढवले टेंशन, बुमराहने 2 वेळा केले बोल्ड

On: मंगळवार, सप्टेंबर 17, 2024 1:07 PM
Rohit-Sharma-And-Yashasvi-Jaiswal
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका या आठवड्यापासून सुरू होत आहे. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ चांगलाच घाम गाळतोय. आपल्या कसोटी कारकिर्दीची शानदार सुरुवात करणारा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सोमवारी भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान जसप्रीत बुमराह आणि इतर वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. जयस्वाल हा भारतीय क्रिकेटचा भावी स्टार मानला जातो. त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांतच त्याने छाप पाडली आहे.

या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या पहिल्या नऊ कसोटी सामन्यांमध्ये 68.53 च्या सरासरीने 1028 धावा केल्या आहेत. मात्र, यातील 700 हून अधिक धावा त्याने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. 19 सप्टेंबरपासून होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या तस्किन अहमद आणि नाहिद राणा या वेगवान गोलंदाजांचे आव्हान जयस्वालसमोर असेल.

तस्किन आणि राणा यांनी पाकिस्तान दौऱ्यावर आपल्या वेग, स्विंग आणि उसळीने पाकिस्तानच्या फलंदाजांना त्रस्त केले होते. त्यांनी संघाला प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यास मदत केली. चालू हंगामातील प्रथमश्रेणी सामन्यांमध्येही जयस्वालला छाप पाडण्यात अपयश आले होते. दुलिप ट्रॉफी सामन्यात आवेश खान आणि खलील अहमदच्या चेंडूवर तो स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतलेला.

चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी जयस्वालने बुमराहविरुद्ध खूप सराव केला. बुमराहने त्याला बराच वेळा अडचणीत आणले. तसेच, सिमरजीत सिंग, गुरनूर ब्रार आणि गुर्जनप्रीत सिंग सारख्या नेट गोलंदाजांविरुद्धही तो तितका सहज दिसत नव्हता. अनेकवेळा चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरच्या बाजूला लागला. जयस्वालला बुमराहच्या स्विंग आणि उसळीशी जुळवून घेता आले नाही. यानंतर जयस्वालने अनुभवी विराट कोहलीशी संवाद साधला. ऐच्छिक सराव सत्रात कोहली आणि जयस्वाल यांनी जवळपास तासभर फलंदाजी केली.

हेही वाचा-

“सर्वात वेगवान 50 पासून 500 विकेट्सपर्यंतचा विक्रम”, वाढदिवसादिनी जाणून घ्या दिग्गज फिरकीपटूचे खास रेकाॅर्ड्स
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय गोलंदाज, दिग्गज फलंदाजाचाही समावेश
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---