जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही समावेश होतो. ऑस्ट्रेलियाने एकापेक्षा एक खेळाडू क्रिकेट जगताला दिले आहेत. त्यामध्ये स्टीव्ह स्मिथ याच्या नावाचाही समावेश होतो. सध्या स्मिथ ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग 2023 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात स्मिथने शतक झळकावत टीकाकारांची बोलती बंद केली आहे. सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळताना स्मिथने शतक झळकावले. यावेळच्या आयपीएल लिलावात स्मिथला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. त्यांच्या मते, स्मिथ सावकाश फलंदाजी करतो. मात्र, स्मिथला या क्रिकेट प्रकारात खेळत राहायचे आहे. तसेच, त्याला सलामीलादेखील फलंदाजी करायची आहे.
बिग बॅश लीग 2023 (Big Bash League 2023) स्पर्धेचा 45वा सामना मंगळवारी (दि. 17 जानेवारी) सिडनी सिक्सर्स विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स संघात पार पडला. या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाचा विस्फोटक फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने 56 चेंडूत 101 धावा चोपल्या. हे शतक ठोकताना त्याने 5 चौकार आणि 7 षटकारांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याने 180.36च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई केली. अशात त्याने टी20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करण्याबाबत वक्तव्य केले.
For your viewing pleasure: all 12 glorious boundaries from Steve Smith's maiden BBL ton 🤩#BBL12 pic.twitter.com/QqbvGmIEMF
— KFC Big Bash League (@BBL) January 17, 2023
काय म्हणाला स्मिथ?
स्मिथचा समावेश ऑस्ट्रेलिया संघाच्या सर्वात विश्वासू खेळाडूंमध्ये होतो. स्मिथ यावेळी बोलताना म्हणाला की, “टी20 क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करणे आदर्श आहे. एकदा पॉवरप्लेमध्ये सेट झाल्यानंतर फलंदाज त्याचे शॉट सहजरीत्या खेळू शकतो.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला वरच्या फळीत फलंदाजी करायला आवडते. तुम्हीच सांगा टी20त कोणाला सलामीला खेळायला आवडणार नाही? यामुळे तुम्हाला पहिल्या चेंडूपासून खेळण्याची संधी मिळते. मी आयपीएलमध्ये अनेकदा सलामीला फलंदाजी केली आणि मला त्यात मजा आली. मी याबाबत जास्त विचार करत नाही. फक्त मैदानात जातो आणि फलंदाजी करून आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न करत राहील आणि पाहील की, भविष्यात काय होते.” स्मिथची ही इच्छा ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते.
After 12 seasons, the @SixersBBL FINALLY get their first BBL century 🤯#BBL12 pic.twitter.com/nqFTFr66U1
— KFC Big Bash League (@BBL) January 17, 2023
लिलावात 2 कोटी होती मूळ किंमत
आयपीएल लिलावात स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्स आमि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून सलामीला खेळला आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 138.33 इतका राहिला आहे. स्पर्धेत तो सर्वाधिक वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. तिथे त्याचा स्ट्राईक रेट 128.33 इतका राहिला आहे. यावेळी आयपीएल लिलावात स्मिथची मूळ किंमत ही 2 कोटी रुपये होती. मात्र, कोणत्याही फ्रँचायझी संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेण्यात रस दाखवला नाही. (australian cricketer steve smith on opening in t20 format know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जास्तीत जास्त टी10 लीग खेळवा”, भारताच्या जगज्जेत्या खेळाडूंनी केली मागणी
आपल्याच मुलींमुळे वैतागला डेविड वॉर्नर! इच्छा नसतानाही करायला लावत आहेत डान्स