सोमवारी (16 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका असा सामना खेळला गेला. लखनऊ येथील एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 5 गडी राखून विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने स्पर्धेतील आपले गुणांचे खाते खोलले. सलग दोन पराभवानंतर मिळालेल्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे मनोबल वाढलेले दिसले. मात्र, त्याचवेळी या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला स्पर्धेत आश्वासक सुरुवात करता आली नव्हती. यजमान भारताने त्यांना 6 गडी राखून पराभूत केलेले. तर दक्षिण आफ्रिकेने देखील त्यांचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे त्यांना अनिवार्य होते. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने हा विजय साकार केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांचे चांगले समर्थन संघाला पाहायला मिळाले.
Australian fan chanting 'Ganpati Bappa, Moriya' at the Ekana Stadium.pic.twitter.com/vsRrfT92FF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 17, 2023
या सामन्यात दरम्यान ऑस्ट्रेलियाचे काही चाहते थेट गणपती बाप्पा मोरया असा वारंवार जयघोष करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.
या सामन्याचा विचार केल्यास श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेला परेरा व निसंका यांनी शतकी सलामी दिली. मात्र, त्यानंतर त्यांचा डाव कोसळला. ऍडम झम्पा याने सर्वाधिक चार तर कर्णधार कमिन्स व स्टार्क यांनी प्रत्येकी दोन बळी घेत श्रीलंकेचा डाव 209 धावांवर संपवला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. मात्र, मिचेल मार्श व जोश इंग्लिस यांनी अर्धशतके करत ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला.
(Australian Fans Chanting Ganpati Bappa Morya In Ekana Stadium Against Srilanka)
byRMy0jL*qB*Tv45*tRqwkO^