---Advertisement---

“मी अँडरसन सारखा नाही जो 40…” ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य!

On: बुधवार, ऑगस्ट 21, 2024 5:12 PM
Mitchell Starc
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बाॅर्डर गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) खेळली जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबद्दल उत्सुक असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्टार्क 100 कसोटी खेळण्याच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत त्याच्या निवृत्तीवरही प्रश्न विचारले जात आहेत. यावर मिचेल स्टार्कनं (Mitchell Starc) स्पष्टपणे सांगितले की, त्याने आत्तापर्यंत याबद्दल विचार केलेला नाही.

निवृत्तीच्या प्रश्नावर स्टार्क म्हणाला, “आजही माझ्यासाठी कसोटी सामने नक्कीच सर्वात महत्वाचे आहेत पण मला वाटतं की, कोणताही निर्णय घेण्यात माझे शरीर महत्वाची भूमिका बजावेल. मी जिमीसारखा नाही जो वयाच्या 40व्या वर्षापर्यंत खेळत राहिला. त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची अप्रतिम कला होती. मी अशा प्रकारचा गोलंदाज कधीच नव्हतो. हे काम करण्यासाठी आपल्या देशात अनेक प्रतिभावान गोलंदाज आहेत. पुढच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे, आत्तापर्यंत मी कशाचीही एक्सपायरी डेट सेट केलेली नाही.”

मिचेल स्टार्क (Mitchell Starc) 100 कसोटी सामने खेळण्यापासून फक्त 11 सामने दूर आहे आणि त्यानं दीर्घकालीन फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा कोणताही विचार केला नाही. तो म्हणाला, “जेव्हा मला बॅगी ग्रीन कॅप घालण्याची संधी मिळते तेव्हा ते खूप खास वाटते. उन्हाळी हंगामातील पाचही कसोटी सामने जिंकण्यात आम्ही यशस्वी होऊ, अशी आशा आहे. 100 कसोटी सामने खेळण्याचा प्रश्न आहे, तो नक्कीच खूप शानदार असेल.”

स्टार्कचं वय सध्या 34 वर्ष 204 दिवस आहे. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 89 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 65 टी20 सामने खेळले आहेत. 89 कसोटी सामन्यात त्यानं 27.74च्या सरासरीनं 358 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची इकाॅनाॅमी 3.42 राहिली आहे. 121 एकदिवसीय सामन्यात 236 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 22.96 राहिली आहे, तर 65 टी20 सामन्यात त्यानं 79 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहली खरंच बदलला आहे का? पियुष चावलाचा मोठा गाैप्यस्फोट!
5 चेंडू 5 षटकार, या गोलंदाजाची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर होती; पण कोहलीने आयुष्य बदलले
लेडी बुमराह! शाळेतल्या मुलीनं कॉपी केली जसप्रीत बुमराहची बॉलिंग ॲक्शन; VIDEO व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---