ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक गोल करणारा टीम काहिल इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर फुटबॉल क्लबकडून खेळणार आहे.
३८ वर्षीय काहिल डिसेंबरमध्ये त्याचा पहिला क्लब मिलवॉलकडे परतला. याआधी तो ए लीगमध्ये मेलबर्न सिटीकडून खेळत होता. मिलवॉलमध्ये जाण्याआधी तो चॅम्पियनशीप क्लबकडून खेळत होता.
“मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की मी आता आयएसएलमधील जमशेदपूर फुटबॉल क्लबकडून खेळणार आहे”, असे काहिलने ट्विट केले.
Part 1 of 2 – I'm excited to announce that I'm signing for Jamshedpur FC in the Indian Super League.
I’ve been really impressed in my conversations with the club by their professionalism and goals for what they want to achieve. pic.twitter.com/uuUcMQ06yi— Tim Cahill AO (@Tim_Cahill) September 1, 2018
जमशेदपूरने एव्हरटनचा माजी फुटबॉलपटू काहिलशी केलेल्या कराराविषयी कोणतीही अधिकृत माहिती सांगितली नाही. काहिलने १४ वर्षे ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ५० तर एव्हरटनकडून ६८ गोल केले आहेत.
तसेच काहिलचा रशियात झालेला त्याच्या कामगिरीतील चौथा फिफा विश्वचषक होता. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली. या चार विश्वचषकात त्याने एकूण ५ गोल केले.
जमशेदपूरचा आयएसएलमध्ये दुसरा हंगाम असून मागच्या हंगामात ते १० संघामध्ये पाचव्या स्थानावर होते. तसेच आयएसएलच्या पाचव्या हंगामाला १७ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जुवेंटसकडून क्रिस्तियानो रोनाल्डोची गोलची पाटी कोरीच
–वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी