टी२०मध्ये जर ८५ मीटरपेक्षा लांब षटकार मारला तर त्याला ६ ऐवजी ८ धावा द्याव्यात असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डीन जोन्स मांडले आहे.
सध्या जगात कसोटी टिकण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत असुन टी२०मध्ये मात्र सतत बदल होत आहे. त्यामुळे ८५ मीटरचा हा नवा नियम करायला काही हरकत नसल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
जर हा नियम केलाच तर टी२० हे काळानुरुप चालेल आणि चाहत्यांनाही हा बदल भावेल असेही ते म्हणाले.
डीन जोन्स हे फटकेबाजी क्रिकेट जगतात ओळखळे जात असतं. ५७ वर्षीय जोन्स यांनी आॅस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी आणि १६४ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकुण ७४ षटकार मारले असुन वनडेत त्यांचा स्ट्राईक रेट हा ७२.५७ होता.
षटकार हा १०८ वर्ष जूना नियम आहे. १९१० पर्यंत चेंडू जर मैदानाबाहेर गेला तरच षटकार देण्यात येत असे. तो नियम १९१०मध्ये बदलुन चेंडू जर हवेतून सिमारेषापार गेला तर षटकार देण्यात येऊ लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!
-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!
–एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?
–२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल!
-Breaking- एबी डिविलियर्सने केले बेंगलोरला ट्विटर, इंस्टाग्रामवर अनफाॅलो!