टी20 विश्वचषक सुरू होण्यासाठी आता महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या प्रमुख देशांनी आपले संघ देखील जाहीर केले आहेत. आता या विश्वचषकासाठी विविध संघांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, इंग्लंडने विश्वचषकासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
विजेतेपदाचे दावेदार म्हणून पुन्हा एकदा इंग्लंड विश्वचषकात सहभागी होईल. मागील वर्षी त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. 2010 नंतर इंग्लंड प्रथमच विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. यावेळी संघाचे नेतृत्व सलामीवीर जोस बटलर हा करतोय. या विश्वचषकासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश केला आहे. खास विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज व मिस्टर क्रिकेट नावाने ओळखला जाणारा माईक हसी हा इंग्लंड संघाला मार्गदर्शन करेल. कोचिंग कन्सल्टंट हे पद त्याच्याकडे देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त यापूर्वी देखील इंग्लंड संघासह गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या डेविड सेकर यांनादेखील संघाला मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण केले गेले. सध्या हसी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. तर, सेकर यांनी 2010-2015 या काळात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावली होती.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून याबाबत माहिती देताना म्हटले गेले, ‘आगामी टी20 विश्वचषकात डेव्हिड हसी व डेव्हिड सेकर हे मॅथ्यू मॉट्स यांना सहकार्य करतील. सेकर संघाच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच संघाशी जोडले जाणार आहेत. तर हसी थेट विश्वचषकावेळी संघात सामील होईल. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली संघ नक्कीच शानदार कामगिरी करून दाखवेल.’
टी20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ऍलेक्स हेल्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! संघनिवडीच्या बैठकीत संजूचे नावही घेतले नाही; बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा
जेव्हा ‘बॉल आउट’द्वारे भारताने पाकिस्तानला दिला होता धोबीपछाड, 3-0ने जिंकला होता सामना
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…






