---Advertisement---

Australian Open 2024 : सुमितने ऑस्ट्रेलियात गाजवले मैदान, तब्बल 35 वर्षांनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Sumit-Nagal
---Advertisement---

भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलने आज(16 जानेवारी) रोजी ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. अगदी मागच्या वर्षीपर्यंत जेमतेम 80,000 रू बॅंक अकाउंट असणाऱ्या या खेळाडूने ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा कितीतरी आघाडीवर असणाऱ्या खेळाडूस त्याने धूळ चारली.

1989 नंतर ही कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
भारताचा युवा स्टार टेनिसपटू सुमित नागलने(Sumit Nagal) ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या पहिल्या फेरीत कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिकचा(Alexander Bublik) पराभव केला. ही एक ऐतिहासिक कामगिरी असून, तब्बल 35 वर्षांनंतर एका भारतीय खेळाडूने ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सीडेड खेळाडूचा पराभव केला आहे. 1989 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अशी कामगिरी रमेश क्रिश्नन यांनी केली होती. त्यांनी त्यावेळीचा नंबर वन आणि गतविजेत्या मॅट्स विलॅंडरचा पराभव केला होता. (Sumit Nagal ends 34-year wait: From Rs 80,000 in the bank at start of last year to becoming the first Indian after Ramesh Krishnan to beat a seeded player in a Grand Slam)

सरळ सेट्स मध्येच चारली धूळ
जागतिक क्रमवारीत 27 व्या स्थानी असलेल्या बुबलिकचा सुमितने 6-4, 6-4, 7-6(7-5) असा सरळ सेट्स मध्ये पराभव केला. 2 तास 38 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सुरूवातीपासूनच सुमितचे वर्चस्व दिसून आले. पहिल्या दोन सेट्समध्ये बुबलिकची सर्व्हिस ब्रेक करण्यात सुमितला यश आले. परंतु, तिसरा सेट मात्र टाइ-ब्रेकर पर्यंत गेला होता. त्यातही बाजी मारत नागलने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाने तो ऑस्ट्रेलियन ओपनच्या दूसऱ्या फेरीत पोहोचणारा 2013 नंतर पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी सोमदेव देववर्मन याने ही कामगिरी केली होती.

सुमितने दूसऱ्यांदा ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत विजय मिळवला आहे. याआधी त्याने ही कामगिरी 2020 च्या यूएस ओपन स्पर्धेत केली होती. तसेच क्रमवारीतील टॉप 100 मधील खेळाडूला हरवण्याचीही त्याची ही पहिलीच वेळ आहे. ही कामगिरी अत्यंत महत्वाची आणि गर्वाची असून पुढे तो काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष राहील.

वाचा आणखी बातम्या –

ICC Player Of The Month । अष्टपैलू खेळाडूने मारली बाजी, मिळालं डिसेंबमधील प्रदर्शनाचं बक्षीस
‘वेगळं काही करण्याची गरज नाही…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा फलंदाजी सुधारण्यासाठी गिलला सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---