---Advertisement---

ऑस्ट्रेलियन समालोचक मायकल स्लेटरच्या घाणाघाती ट्विटवर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: मंगळवार, मे 4, 2021 8:23 PM
---Advertisement---

संपूर्ण जगभरात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. या महामारी पासून जगातील जवळजवळ कुठलाही देश वाचलेला नाही. यामुळे अनेक देशांनी काही कठोर नियम निर्माण करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांमध्ये आघाडीचा क्रमांक येतो तो ऑस्ट्रेलियाचा. जगातील काही कठोर कोरोना नियमांपैकी ऑस्ट्रेलियाचे नियम गणले जातात. ऑस्ट्रेलियाने नुकतेच काही दिवसांपूर्वी आयपीएल संदर्भात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना व इतर सदस्यांना ऑस्ट्रेलियात येण्यासंदर्भात काही कडक निर्बंध लावले होते.

ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातलेली आहे. याबद्दल ऑस्ट्रेलियन समालोचक मायकल स्लेटरने नाराजी व्यक्त केली होती. स्लेटरच्या घणाघाती ट्विटर आता ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मॉरिसन यांनी स्पष्ट केले की भारतातून इतरत्र प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही बाब चिंताजनक असून कोरोनाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी कठोर निर्बंध हे अतिशय गरजेचे आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी स्लेटर यांनी ट्विटमध्ये लिहिले होते, “जर पंतप्रधानांना आम्हा ऑस्ट्रेलियन नागरिकांची काळजी असेल तर ते आम्हाला ऑस्ट्रेलियात परतण्याची परवानगी देतील. सध्याच्या घडीला पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला तुम्ही जबाबदार असाल. आमच्या सोबत तुम्ही असे वागू शकत नाहीत. क्वारंटाईन प्रणालीमध्ये बदल करण्याची जबाबदारी तुमची आहे. आयपीएलमध्ये काम करण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”

आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यामुळे आगामी काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतणार आहेत. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मायदेशी परतण्याबाबत काय घडामोडी घडतात.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतात कोरोनाचा प्रभाव पाहून पीटरसन झाला भावूक; म्हणाला, “ज्या देशावर मी इतके प्रेम करतो त्या देशाचे असे…”

आयपीएलदरम्यान कोरोनाबाधित झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी; बनू शकतो ११ जणांचा एक संघ

“खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून प्रवासबंदीत कुठलीही सूट मागणार नाही”, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले स्पष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---