---Advertisement---

आयपीएलदरम्यान कोरोनाबाधित झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी; बनू शकतो ११ जणांचा एक संघ

On: मंगळवार, मे 4, 2021 7:52 PM
---Advertisement---

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला आहे. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील, आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत लीगमधील बरेच खेळाडू आणि प्रशिक्षक संक्रमित झाले होते. त्यांना एकत्रित आणले की एक ११ जणांचा तयार होऊ शकते.

आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द झाल्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आज (४ मे) सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आयपीएल कमिटीने तातडीची बैठक घेऊन आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

यावर राजीव शुक्ला यांनी म्हटले होते की,” आम्ही यावर नक्कीच विचार करू की, या वर्षी पुढे आम्हाला आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यासाठी योग्य वेळ मिळतो का? सप्टेंबरमध्ये होऊ शकते, परंतु सध्या ही केवळ शक्यता असेल. आताची परिस्थिती पाहता आम्ही आयपीएल स्पर्धेचे आयोजन करत नाही आहोत.” यावरून असे स्पष्ट होत आहे की येणाऱ्या काळात आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येऊ शकतात परंतु, याबद्दल काहीही निश्चित नाही.

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अनेक दिग्गजांनी आयपीएल २०२१ स्पर्धा खेळवण्यावर टीका केली होती. अशातच सोमवारी (३ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघातील संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस साफ करणारा कर्मचारी यांना तसेच अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील ५ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. एवढेच नाही तर मंगळवारी (४ मे) दिल्ली संघातील अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील वृद्धिमान साहा या खेळाडूंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यापूर्वी आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाही काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

या खेळाडूंनी घेतली होती माघार

कोरोनाच्या भीतीपोटी ऑस्ट्रेलियन संघातील तीन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. यामध्ये केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), ॲडम झम्पा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) आणि अँड्र्यू टाय (राजस्थान रॉयल्स) यांचा समावेश होता. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे माघार घेतली होती.

या खेळाडू आणि प्रशिक्षकांना झाली होती कोरोनाची लागण
१)वरूण चक्रवर्ती – कोलकाता नाईट रायडर्स
२)संदीप वॉरियर – कोलकाता नाईट रायडर्स
३)नितीश राणा – कोलकाता नाईट रायडर्स
४)देवदत्त पडीक्कल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
५)अक्षर पटेल – दिल्ली कॅपिटल्स
६)एन्रीच नोर्किए- दिल्ली कॅपिटल्स
७)डॅनियल सॅम्स – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
८)अमित मिश्रा – दिल्ली कॅपिटल्स
९)वृद्धिमान सहा -सनराइजर्स हैदराबाद
१०)लक्ष्मीपती बालाजी (प्रशिक्षक ) – चेन्नई सुपर किंग्ज
११)किरण मोरे (प्रशिक्षक) – मुंबई इंडियन्स

महत्त्वाच्या बातम्या –

“खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून प्रवासबंदीत कुठलीही सूट मागणार नाही”, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले स्पष्ट

आयपीएल तर रद्द झालीय, आता परत कधी आपण भारतीय क्रिकेटपटूंना खेळताना पाहणार? जाणून घ्या थोडक्यात

आयपीएल रद्द झाल्यामुळे स्टार स्पोर्ट्सला मोठा आर्थिक फटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---