---Advertisement---

VIDEO: भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेआधी झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचे बडेबोल! म्हणाला, “ही मालिका एकतर्फी नाही…”

On: मंगळवार, जुलै 21, 2026 3:10 PM
---Advertisement---

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने आगामी टी 20 मालिकेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या मालिकेत त्याचा संघ भारताला चांगलेच आव्हान देईल, असे मत त्याने व्यक्त केले आहे. या मालिकेचा विश्वविजेता संघ प्रबळ दावेदार असेल, हा दावा त्याने फेटाळून लावला असून ही मालिका अपेक्षेपेक्षा खूपच संतुलित होईल असेही विधान त्याने केले आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध भारत यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. यामधील पहिला सामना 23 जुलैला, दुसरा सामना 25 जुलैला आणि तिसरा सामना 26 जुलैला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने हरारेमध्ये खेळले जाणार आहेत.

झिम्बाब्वे मागील काही महिन्यांपासून रोमांचक आणि उत्तम क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे या मालिकेत संघ भारताला चांगली स्पर्धा देईल. “या मालिकेत दोन्ही संघांना समान संधी असेल. पण एका गोष्टीबद्दल मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकतो की, झिम्बाब्वे सातत्याने अतिशय चांगला आणि मनोरंजक खेळ करत असल्याने ही मालिका नक्कीच खूप मनोरंजक ठरेल,” असे रझाने स्टार स्पोर्टला सांगितले आहे.

“दोन्ही संघ पुनर्रचनेच्या टप्प्यातून जा आहे. त्यामुळे ही मालिका चांगलीच चुरशीची होईल. भारत स्थित्यंतरातून (ट्रान्झिशन) जात आहे आणि काही प्रमाणात झिम्बाब्वेमध्येही थोडे स्थित्यंतर असल्याने, मला ही मालिका एकतर्फी वाटत नाही,” असेही रझाने पुढे म्हटले आहे.

झिम्बाब्वेची धक्कादायक कामगिरी
झिम्बाब्वेने नुकतेच आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या इतिहासातील धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. त्यांनी 2026 च्या आवृत्तीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे माजी विजेता संघ साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाला होता.

भारताने नुकतेच नव्या नेतृत्वापदाखाली (श्रेयस अय्यर) आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात टी 20 मालिका खेळल्या. या दोन्ही मालिकांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संघाकडून झिम्बाब्वे दौऱ्यात चांगल्या कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---