भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या कोळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसरा सामना देखील तिसऱ्याच दिवशी निकाली निघाला. पण यावेळी भारतीय संघ पराभूत झाला असून ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. पराभवानंतर भारतीय संघ या कसोटी मालिकेत सध्या 2-1 अशा आघाडीवर आहे.
उभय संघांतील या इंदोर कसोटीत भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, परिणामी संघाला पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील या सामन्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर परिणाम होईल. अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाचे स्थान आता जवळपास पक्के झाले आहे. दुसरीकडे भारतीय संघाला मात्र अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अजूनही कसरत काही सामने खेळावे लागतील. होळकर स्टेडियमवर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवसा. ऑस्ट्रेलियान सलामीवीर उस्मान ख्वाजा याची एकमेवर विकेट भारताला मिळाली. फिरकीपटू रविचंद्नन अश्विन () याने ख्वाजाला शुन्यावर तंबूत पाठवले.
या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी मात्र पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजीसाटी आनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. इंदोर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तार ऑस्ट्रेलियन संघ देखील 197 धावा करून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वबाद झाला. पहिल्या डावानंतर भारतीय संघ 88 धावांनी मागे होता. दुसऱ्या दिवसी भारतीय संघा पुन्हा फलंदाजीला आणि संघाचा दुसरा डाव दुसऱ्या दिवशी संपला देखील. यावेळी अवघ्या 163 धावा करून भारताने सर्व विकेट्स गमावल्या. शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे शुक्रवारी (3 मार्च) पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने गाठले.
उभय संघांतील या सामन्यात फिरकीपटूंचे पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन दिग्गज नाथन लायन याने दुसऱ्या डावात तब्बल 8 विकेट्स, तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स नावावर केल्या. तसेच मॅथ्यून कुहनेमन याने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या एक विकेट घेतली. भारतासाठी पहिल्या डावात रविंद्र जडेजाने 4, रविचंद्रन अश्विन याने 3 आणि उमेश यादव याने 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात मात्र एकट्या अश्विनलाच विकेट मिळाली.
(Australian team won the third test match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रबाडाच्या तुफानी गोलंदाजीने सेंच्युरियन कसोटी तीन दिवसांत निकाली! वेस्ट इंडीजचा दारुण पराभव
लय भारी! अफलातून झेल टिपत कॅप्टन स्मिथने दाखवला पुजाराला तंबूचा रस्ता, पाहा तो व्हिडिओ