Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रबाडाच्या तुफानी गोलंदाजीने सेंच्युरियन कसोटी तीन दिवसांत निकाली! वेस्ट इंडीजचा दारुण पराभव

March 2, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारी (2 मार्च) समाप्त झाला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवत तिसऱ्या दिवशी सामना खिशात घातला. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने दुसऱ्या डावात ‌‌6 बळी टिपून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

South Africa wrap up a win in Centurion after a clinical bowling performance 💪#WTC23 | #SAvWI | 📝: https://t.co/gUTbzlPZ7j pic.twitter.com/K4gPqtOH1Y

— ICC (@ICC) March 2, 2023

 

सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर खेळला गेलेल्या या सामन्यात तीनही दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला डीन एल्गर व ऐडन मार्करम यांनी शतकी सलामी दिली. एल्गरने 71 धावांची खेळी केली. नवीन वर्षात शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मार्करम याने आपल्या खेळीचे रूपांतर शतकात करत दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावसंख्येकडे नेले. पहिल्या दिवशी या मैदानावर आठ बळी पडले. दुसऱ्या दिवशी लवकरच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 342 धावांवर संपुष्टात आला.

वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात रेमन रिफर वगळता इतर फलंदाज फारसा संघर्ष करू शकले नाहीत. त्याने एकट्याने अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेसाठी वेगवान गोलंदाज एन्रिक नोर्कीए याने सर्वाधिक पाच बळी मिळवले. वेस्ट इंडीजचा पहिला डाव केवळ 212 धावांवर संपुष्टात आला.‌ दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात सुरुवात अतिशय खराब राहिली. अल्झारी जोसेफ व जेसन होल्डरने 49 धावांत त्यांचे चार गडी बाद केले होते. दुसऱ्या दिवशी या सामन्यात तब्बल 16 गडी बाद झाले.

तिसऱ्या दिवशी लवकर केमार रोच याने 4 बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव 116 धावांत संपवला. त्यानंतर वेस्ट इंडीजला विजयासाठी अडीच दिवसात 247 धावा करायच्या होत्या. मात्र, रबाडाने सहाबळी आपल्याला नावे करत वेस्ट इंडिजला 159 पर्यंत रोखले. जर्मन ब्लॅकवूडने 79 धावा करत एकाकी झुंज दिली. तरीही, वेस्ट इंडिजला 87 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावात शतक करणारा मार्करम सामनावीर ठरला.

(South Africa Beat West Indies In First Test By 87 Runs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने उरकला साखरपुडा, पार्टनरला किस करत जगाला सांगितली आनंदाची बातमी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन


Next Post
Virat Kohli Umesh Yadav

"क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते", प्रमुख गोलंदाज म्हणतोय भारताला अजूनही विजयाची संधी

Simon Taufel

क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! कसाबसा अंपायर सायमन टफेल यांनी आपला प्राण वाचवला

australia

कांगारुंचे कमबॅक! इंदोर कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी सकाळीच लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143