---Advertisement---

धक्कादायक! प्रसिद्ध टेनिसपटूने स्वत:च्याच एक्स गर्लफ्रेंडला कारमधुन ढकलेले

Nick Kyrgios
---Advertisement---

सन 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरी विजेतेपद जिंकणारा, ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गिओस सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निक त्याच्या खेळातील कामगिरीपेक्षा आक्रमकता, त्याची वादग्रस्त विधाने आणि त्याने केलेल्या कृत्यांमुळे नेहमी चर्चेत राहिला. ‘बॅड बॉय’ अशी प्रतिमा असलेल्या निकवर, लैंगिक शोषण आणि प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप त्याच्या एक्स गर्लफ्रेंड ‘चियारा पसारी’ने केला. हे प्रकरण इतके गंभीर होते की, आता निकला कोर्टापर्यंत जावे लागले. चला जाणुन घेऊ या…नेमके काय आहे हे प्रकरण?

टेनिसपटू निक किर्गिओस (Nick Kyrgios) आणि चियारा पसारी (Chiara Pasari) दोघे एकमेकांना डेट करत होते. परंतु 2021 साली त्यांचे भांडण झाले. या भांडणानंतर चियाराने कार चालवण्यापासून रोखल्यानंतर तीला निकने रागात रस्त्यावर ढकलले. त्यामुळे तिच्या खांद्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच चियाराने त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचाही आरोप केला. यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. या घटनेच्या 10 महिन्यांनंतर चियाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. नुकत्याच झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर निक हा क्रॅचवर कोर्टात दाखल झाला. दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घ्यावी लागली. यासंदर्भात निकने कॅनबेरा कोर्टात (Canberra Court) चियारावर हल्ला केल्याची कबुली दिली.

परंतू त्याच्या वकिलाने, निकने हे कृत्य मानसिक त्रासातून केले असे सिद्ध केले. त्यामुळे कोर्टाने त्याला निर्दोष मुक्त केले. परंतु कोर्टाने निकला केलेले कृत्य चुकीचे होते असे ठणकावून सांगितले. त्यावर निक म्हणाला, “जेव्हा हे घडले तेव्हा माझी मानसिक स्थिती ठिक नव्हती. मी त्यावेळेस एका कठीण परिस्थितीतुन जात होतो. मला केलेल्या कृत्याचा मनापासून खेद वाटतो. माझ्या कृत्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.” निकच्या मानसशास्रज्ञ (Psychologist) सॅम बोरेन्स्टीन यांनी कोर्टाला सांगितले की त्याचा मानसिक आजारामुळे तो स्वतःला हानी पोहोचवण्याच्या विचारांनी ग्रासले होता. परंतु त्याची प्रकृती हळूहळू सुधारतेय.

https://www.instagram.com/p/CoNElvVA1cA/?utm_source=ig_web_copy_link

निकचे (Nick Kyrgios) हे पहिलेच कृत्य नसून या आधीही त्याने असे कृत्य केले होते. विम्बल्डन (Wimbledon Tennis Tournament) स्पर्धेदरम्यान निक रागाच्या भरात प्रेक्षकांच्या दिशेने थुंकला होता. यावरुन बराच वाद देखिल झाला होता. त्यामुळे त्याला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

निकने चार वर्षांपुर्वी त्याच्या सोशल मिडियावरुन एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल तपशीलवार माहिती दिली. त्यात त्याने अस म्हंटल होत की, “मी मानसिकदृष्ट्या ठीक आहे. माझ्या आयुष्याचा आनंद लुटत आहे. असे सर्वांना वाटत असेल, पण हा माझा सर्वात वाईट काळ होता.” चार वर्षांपुर्वी तो नैराश्यातुन (Depression) आणि मानसिक त्रासातून जात असताना त्याला आत्महत्येचा विचार येत होते. परिणामी तो ड्रग्सच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो वाईट परिस्थितीतुन जात होता.

सध्या निक (Nick Kyrgios) हा ब्लॉगर कोस्टीन हॅट्झीला (Costeen Hatzi) डेट करत आहे. दोघेही सोशल मीडियावर खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. निक आणि हॅट्झी एकत्र फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.  (Australian Tennis Player Nick Kyrgios pleaded guilty to Assault charge levied against by ex Girlfriend Chiara Pasari)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘शुभमन हा भारतीय क्रिकेटचे वर्तमान’, माजी भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य
राष्ट्रीय संघापेक्षा फ्रँचायझीला अधिक प्राधान्य देत आहेत इंग्लिश खेळाडू, कर्णधार बटलर नाराज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---