ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून (१५ जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना सुरू असून आज (१८ जानेवारी) या सामन्याचा चौथा दिवस होता. यादिवशी मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मिळून ऑस्ट्रेलियन संघाला एका-नंतर-एक दणके दिले. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. यासह पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीत भर पाडत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान दिले.
यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सामना पंचांनी शार्दुलला तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने चेतावणी दिल्याचा प्रकार घडला. यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर पंचांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
ही घटना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ७५व्या षटकात घडली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. अशात युवा गोलंदाज शार्दुल डावातील ७५वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने षटकातील तिसरा चेंडू १२१ किमी दर ताशी वेगाने टाकला. यावर फलंदाजी करत असलेला कमिन्स धाव घेऊ शकला नाही.
त्यानंतर शार्दुलने पुढे १३३ किमी दर ताशी वेगाने बाउंसर टाकला. हे पाहून सामना पंच ब्रूस ऑक्सफर्ड यांनी शार्दुलला हळूवार गोलंदाजी करण्यास सांगितले. तसेच त्यांनी शार्दुलचा तो चेंडू वाईड बॉल असल्याचेही घोषित केले. पंच ऑक्सफर्ड यांच्या या हरकतीनंतर भारतीय क्रिकेट रसिक चांगलेच भडकले.
यापुर्वी भारताच्या पहिल्या डावात ११व्या क्रमांकावर फलंदाजी करत असलेल्या टी नटराजनला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने यापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली होती. मग त्यावेळी पंचांनी स्टार्कला चेतावणी का दिली नाही?, असा प्रश्न रसिकांनी उपस्थित केला आहे. तर स्टार्कबरोबर जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्स यांनी भारताच्या तळातील खेळाडूंना वेगवान बाउंसर टाकले होते. यावेळी या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना न रोखता पंच ऑक्सफर्ड शार्दुलवर कसा निशाणा साधू शकतात, अशी टिका भारतीय क्रिकेट रसिकांनी केली आहे.
https://twitter.com/prateek_gayawal/status/1351048060382674948?s=20
Starc can bowl 90 mph bumpers to Nattu , but Shardul can't bowl 80mph bumpers to Cummins, who is btw more than capable to bat.
Ridiculous double standards by Aussie Umpires!
Thoughts? @vishalmalpure10 @Paran2204 @rahulk_1019 @Fancricket12 @AMP86793444 @im_yash2307— Akash Deshpande (@akashd7781) January 18, 2021
@anamnadeem Starc bowling 90 mph bouncers to Natrajan wasn't intimidatory bowling.
Shardul bowling 80 mph to Cummins who is more than a capable as a batsman gets warned.
Ridiculous double standards by Bruce Oxenford!!!
— Mohit Adwani (@mohit_adwani258) January 18, 2021
Australia have been dishing out short-ball across Tests, but Shardul does that and umpire sends him a warning. Umpiring standards top notch #INDvAUS
— Vishal S S Mehra (@weshalltalkcric) January 18, 2021
https://twitter.com/NeelRai31/status/1351048112878579712?s=20
https://twitter.com/AnupamBhaumik_/status/1351048977978896386?s=20
असे असले तरी, भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. १९ षटकात ६१ धावा देत त्याने हा पराक्रम केला.
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुक तर होणारच! ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचा ‘फाइव्ह विकेट हॉल’, भारतीय दिग्गजांनी केली प्रशंसा
रोहित शर्मा बनला ‘कॅच’ मास्टर; ब्रिस्बेन कसोटीत तब्बल ‘इतके’ झेल घेत केली दिग्गजाची बरोबरी
खरंच की काय! मुलीच्या जन्मामुळे विराटने ट्विटर बायोमधून हटवला ‘इंडियन क्रिकेटर’ शब्द ?