---Advertisement---

टी-20 विश्वचषकापूर्वी ‘हा’ संघ करणार भारताचा दौरा

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 4:14 PM
---Advertisement---

यावर्षी ऑक्टोंबर – नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषकाची तयारी म्हणून न्यूझीलंड संघ भारत दौरा करणार आहे. नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून, या दौऱ्यात जास्तीत जास्त टी-20 सामने खेळले जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाला न्यूझीलंडसारख्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध टी20 मालिका खेळण्यास मिळणे विशेष फायद्याचे ठरणार आहे. निश्चितच टी-20 विश्वचषकामुळे या मालिकेत टी-20 सामन्यांवरच पूर्ण लक्ष असू शकेल.

यासोबतच बीसीसीआय दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी देखील चर्चा करणार असून, टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील मालिका होऊ शकते. मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या संकटामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका रद्द करण्यात आली होती. या मालिकेचे नुकसान भरून काढण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

SL vs ENG : रुटचे द्विशतक आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा पहिल्या कसोटीत दमदार विजय

ब्रिस्बेन कसोटीत अंपायरचा शार्दुलवर अन्याय? तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने दिली चेतावणी

ऑस्ट्रेलियात एका कसोटी सामन्यात ७ हून अधिक विकेट्स अन् अर्धशतक, फक्त ‘यांनी’ केलाय हा रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---