भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २१ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील सर्व सामने मकाय (हॅरुप पार्क, मकाय) येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर एक कसोटी आणि तीन टी -२० सामने देखील दोन्ही संघादरम्यान खेळले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये एक सराव सामना खेळला गेला, ज्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३६ धावांनी विजयी मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने रॅचेल हेन्सच्या ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ९ बाद २७८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात हेन्स व्यतिरिक्त मेग लेनिंग ५९, बेथ मूनी ५९, ऍशले गार्डनर २४, अॅनाबेल सदरलँड २०, एलिसा हेलीने ८, एलिस १, तर जॉर्जिया वेअरहॅम १७ धावांवर नाबाद राहिली. भारताकडून गोलंदाजीत पूनम यादवने तीन आणि झुलन गोस्वामीने दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांत सात गडी बाद २४२ धावाच करू शकला. भारताकडून पूजा वस्त्राकरने ५७ धावा केल्या. भारताच्या डावात, पूजा व्यतिरिक्त, दीप्ती शर्मा ४९ धावांवर नाबाद राहिली, तर यास्तिका भाटिया ४१, शफाली वर्मा २७, स्मृती मंधाना १४ आणि मिताली राजने एक धाव केली.
स्टेला कॅम्पबेल ३८ धावा देऊन तीन बळी घेतले तर एलिस पेरीने ३८ धावात दोन गडी बाद केले. कॅम्पबेल आणि पेरी व्यतिरिक्त, सोफी मॉलिनेक्सलाही ऑस्ट्रेलियाकडून एक यश मिळाले. धारदार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज विजय मिळवून दिला.
जागतिक महामारीमुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिला संघात होणारे सर्व सामने मकायच्या हॅरुप पार्क या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने का सोडले नाही वनडे संघाचे नेतृत्व? लावला जातोय ‘हा’ अंदाज
सेहवाग म्हणतोय, ‘…तर मी आरसीबीच्या युवा खेळाडूला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देईल’