जगभरात क्रिकेटचे लाखो चाहते आहेत. ऑस्ट्रेलियातही क्रिकेटची वेगळीच क्रेझ आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. इथले चाहते या गेमला खूप जवळून फॉलो करतात.
मात्र, नुकताच एक व्हिडिओ समोर आला, जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन नागरिक त्यांचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेडसारख्या लोकप्रिय क्रिकेटपटूला ओळखू शकलेले नाही. एका ऑस्ट्रेलियन व्हिडिओ ब्लॉगरनं त्याच्या अधिकृत ‘X’ खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये हा व्यक्ती ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेडबद्दल लोकांना प्रश्न विचारताना दिसत आहे. ब्लॉगर लोकांना विचारतो की तुम्ही पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेडला ओळखता किंवा त्यांच्याबद्दल कधी ऐकले आहे का. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांना त्यांच्याच देशातील लोक ओळखत नाहीत.
वास्तविक, व्हिडिओमध्ये पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड यांच्याबद्दल ऐकलेलं किंवा माहित असलेलं एकही व्यक्ती नव्हतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं गेल्या वर्षी 2023 एकदिवसीय विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. पॅट कमिन्सच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं वनडे विश्वचषकापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपदही पटकावलं होतं. या दोन्ही स्पर्धांमध्ये ट्रॅव्हिस हेडनं जोरदार कामगिरी केली होती. मात्र, एवढं यश मिळवून देखील ऑस्ट्रेलियातील लोक या दोघांना ओळखत नाहीत, याचं भारतीयांना आश्चर्य वाटत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
What a shame for ICC, cricket is dying in Australia. pic.twitter.com/wi7Hhc0MFY
— narsa. (@rathor7_) August 10, 2024
हेही वाचा –
राहुल द्रविडची फलंदाजी तर खूप पाहिली असेल, आता गोलंदाजी पाहा
सुवर्णपदक विजयाच्या आनंदावर विरजण, हेड कोचला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि…
हार्दिक पांड्या एकच सामना खेळून मोडू शकतो गांगुलीचा विश्वविक्रम! विराट-रोहित खूप मागे