---Advertisement---

या क्रिकेटपटूने चक्क हँड सॅनिटायझर लावले चेंडूवर; झाली ही कारवाई

On: सोमवार, सप्टेंबर 7, 2020 9:08 AM
---Advertisement---

मुंबई । ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल क्लेडॉन इंग्लंड काऊन्टी ससेक्स संघाकडून खेळणार होता, पण चेंडूवर हाताच्या सेनेटिझर लावल्यामुळे तो निलंबित झाला आहे. क्लेडॉन यापुढे बॉब विलिस ट्रॉफीसाठी ससेक्सच्या 14 सदस्यांच्या संघात सहभागी होणार नाही. बॉब विलिस करंडक 1 ऑगस्टपासून सुरू झाला आहे.

ससेक्सने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “मिचेल क्लेडॉनला निलंबित करण्यात आले आहे. कारण मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात बॉलवर हाताच्या सेनेटिझर लावला आहे.”  याविषयी अधिक कोणतीही माहिती दिली नाही.  गेल्या महिन्यात मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान ससेक्सकडून खेळत होता. दरम्यान मिचेल क्लेडॉनने चेंडू चमकविण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर केला.  त्या सामन्यात क्लेडॉनने तीन गडी बाद केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडूला लाळ लावण्यास बंदी घातली आहे. डेव्हिड वीज आगामी सामन्यासाठी ससेक्सकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच 16 वर्षीय जेम्स कोल्सचा ससेक्स संघात समावेश करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---