वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (4 नोव्हेंबर) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला. शनिवारच्या डबल हेडरमधील हा दुसरा सामना असून ऑस्ट्रेलियावर इंग्लंडची गोलंदाजी जड पडल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात 286 धावा करून सर्वबाद झाला.
उभय संघांतील या सामन्यात एकटा मार्नस लॅबुशेन सोडला तर एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. दुसरीकडे इंग्लंडसाठी ख्रिस वोक्स य़ाने 9.3 षटकांमध्ये 54 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वुड याने 70 धावा खर्च करून, तर आदिल राशिद याने 38 धावा देत प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. डेव्हिड विली आणि लियाम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
(Australia’s innings wraps up at 286 in match against England)
प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, बेन स्टोक्स, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, एडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.
महत्वाच्या बातम्या –
फखर जमानचे सुपर फास्ट शतक, विश्वचषकात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच पाकिस्तानी फलंदाज
अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ‘पुढे कोणता संघ आहे याचा…’