नुकत्याच सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने क्रिकेट रसिकांचे पैसावसूल मनोरंजन केले. ७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान झालेल्या या लढतीत भारतीय खेळाडूंना सामना अनिर्णीत राखण्यात यश आले. या सामन्यानंतर मंगळवारी (१२ जानेवारी) आयसीसीने जागतिक कसोटी गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याला मोठा फायदा झाला आहे. याउलट भारतीय गोलंदाजांची घसरण झाली आहे.
हेजलवुडची तीन स्थानांनी प्रगती
यापुर्वी आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज हेजलवुडची तीन स्थानांनी घसरण झाली होती. त्यामुळे तो पाचव्या स्थानावरुन आठव्या स्थानी आला होता. मात्र सिडनी कसोटीत ५ विकेट्स घेत त्याने पुन्हा पाचव्या स्थानावर ताबा मिळवला आहे. सिडनी कसोटीतील पहिल्या डावात हेजलवुडने रोहित शर्मा, हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांना बाद केले होते. तर दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराची महत्त्वपुर्ण विकेट त्याने घेतली होती.
तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क याची ३ स्थानांनी घसरण झाली आहे. त्यामुळे तो आठव्या स्थानावर आहे. शिवाय सिडनी कसोटीत पाच विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अव्वल स्थानावर कायम आहे.
Australia's Josh Hazlewood moves up three places ⬆
Here's the latest bowling update in the @MRFWorldwide ICC Test Rankings pic.twitter.com/F1z6IdS9oH
— ICC (@ICC) January 12, 2021
अश्विन, बुमराहची घसरण
भारतीय गोलंदाजांविषयी बोलायचे झाले तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू आर अश्विन यांना सिडनी कसोटीत जास्त विशेष कामगिरी करता आली नाही. त्यांनी या सामन्यात अनुक्रमे ३ आणि २ विकेट्सची कामगिरी केली. याचा परिणाम म्हणून कसोटी क्रमवारीत त्यांची घसरण झाली आहे. अश्विन २ स्थानांनी खाली येत नवव्या स्थानावर आला आहे. तर बुमराह दहाव्या क्रमांकावर आला आहे. मात्र अष्टपैलू रविंद्र जडेजाने पहिल्या डावात सर्वाधिक ४ विकेट्स घेत १३व्या स्थानी उडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रमवारी: सिडनी कसोटीतील झुंजार शतकाचा स्मिथला फायदा, विराटला पछाडत घेतली ‘या’ स्थानी उडी
बापरे, या दुखापती का काय..! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक-दोन नव्हे तब्बल दहा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त
सिडनी येथील कामगिरीने दादा खुश! म्हणाले ‘आता तुम्हाला समजले असेल की….’