---Advertisement---

सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषित, कर्णधार कमिन्सने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

On: मंगळवार, जानेवारी 2, 2024 1:14 PM
Australia Test Squad
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध सिडनीमध्ये तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. उभय संघांतील या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. 3 ते 7 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राउंडवर हा थरार रंगणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार पॅट कमिन्सने आपली प्लेइंग इलेव्हन सर्वांना सांगितली.

सिडनी कसोटीसाठी (Sydney Test) ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केला गेला नाहीये. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मेलबर्नमध्ये पाकिस्तानला ज्या संघाने पराभूत केले, त्याच संघाला सिडनीमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानला व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात संघ असेल.

“सर्व गोलंदाज पूर्णपणे फ्रेश आहेत आणि याच कारणास्तव प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची कुठलीच गरज नाहीये,” असे कमिन्स म्हणाला. कमिन्सच्या मते पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बनवताना दोन सामन्यात पुरेसे अंतर ठेवले गेले आहे. यामुळे खेळाडूंमध्ये कुठल्याही प्रकारचा तान किंवा थकवा पाहायला मिळत नाहीये.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्यासाठी सिडनी कसोटी म्हणजे कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. अशात वॉर्नरला निरोप देण्यासाठी ऑस्ट्रेलियन संग सिडनीमध्ये विजयासाठी शक्य तो प्रत्येक प्रयत्न करताना दिसेल. दुसरीकडे वॉर्नर देखील आपला शेवटचा सामना नेहमी लक्षात राहण्यासाराखा बनवण्यासाठी जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात असेल. सिडनी हे वॉर्नरचे होम ग्राउंड असल्यामुळे याठिकाणी त्याला चीअर करण्यासाठी चाहते मोठ्या संखेने उपस्थित राहू शकातात. (Australia’s playing XI announced for the Sydney Test)

सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन – 
पैट कमिंस (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लियोन, जोश हेजलवुड.

महत्वाच्या बातम्या – 
कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीआधी वॉर्नर टेंशनमध्ये! मौल्यवान बॅगी ग्रीन कॅपची चोरी
Happy New Year 2024 । सर्वांना शुभेच्छा देताना जाफरकडून ‘या’ खेळाडूचा उल्लेख, टीम इंडियाला काढला चिमटा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---