भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांच्यामध्ये नेहमीच तुलना केली जाते. परंतू दोन्ही खेळाडूंची आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये विराट कोहलीचं पारडं जड आहे. तरीही त्या दोघांच्या तुलनेची चर्चा होत असते. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर उस्मान ख्वाजानं (Usman Khawaja) सांगितलं की, विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम यांच्यामध्ये दिग्गज फलंदाज कोण आहे?
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) बाबर आझम (Babar Azam) विरुद्ध कोहलीबद्दल त्याचं मत सांगितलं. त्याला वाटतं आहे की, बाबरची खेळण्याची शैली कोहलीसारखी नाही. परंतू त्याचा खेळण्याचा काही अंदाज विराट कोहलीसारखाच (Virat Kohli) आहे. फाॅक्स क्रिकेटच्या युट्यूब व्हिडिओमध्ये बोलताना उस्मान ख्वाजा म्हणाला, “तो विराटसारखा फलंदाजी करत नाही. परंतू काही कारणांमुळे जेव्हा तुम्ही त्याला खेळताना पाहता तेव्हा तुम्ही त्याला विराटसारखा खेळतो आहे असं बोलता.”
विराट कोहलीच्या (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर कोहलीनं भारतासाठी 2008साली पदार्पण केलं होतं. 2024च्या टी20 विश्वचषकानंतर कोहलीनं टी20 आंतरराष्ट्रीय़ क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कोहलीनं भारतासाठी 113 कसोटी, 294 एकदिवसीय आणि 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 113 कसोटी सामन्यांमध्ये कोहलीनं 49.15च्या सरासरीनं 8,848 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीनं 30 अर्धशतक, 29 शतक आणि 7 द्विशतक झळकावली आहेत.
294 एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीनं 58.34च्या सरासरीनं 13,886 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 93.52 राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर 72 अर्धशतक आणि 50 शतक आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतक झळकावणारा एकमेव खेळाडू आहे. तर 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामम्यात कोहलीनं 4,188 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 137.04 राहिला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 38 अर्धशतक आणि 1 शतक आहे. तसंच कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतक आहेत.
बाबर आझमच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं पाकिस्तानसाठी 52 कसोटी सामन्यांमध्ये 45.85च्या सरासरीनं 3,898 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 26 अर्धशतकांसह 9 शतक झळकावली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 196 आहे. तर 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 88.75च्या स्ट्राईक रेटनं 5,729 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नाववार 32 अर्धशतकांसह 19 शतक आहेत. तर या फाॅरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 158 आहे. बाबरनं 123 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 41.03च्या सरासरीनं 4,145 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 36 अर्धशतक आणि 3 शतक झळकावली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 122 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
1820 दिवसांनंतर तुटणार युनिव्हर्स बॉसचा मोठा विक्रम! रोहित शर्मा ठरणार अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज
नीरज चोप्राची फायनलमध्ये धमाकेदार एँन्ट्री, पहिल्याच प्रयत्नात केला भीमपराक्रम!
Paris Olympic 2024: कुस्तीपटू विनेश फोगाटची क्वार्टरफायनलमध्ये थाटात एँट्री…!!!