भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुखापतीचे सत्र सुरूच आहे . पहिल्या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ला दुखापत झाली असून तो जवळजवळ संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा विचार केला असता सलामीवीर जो बर्नला देखील पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती पण सुदैवाने तो या दुखापतीतून सावरला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोस्की आपल्या दुखापतीतून अजूनही सावरला नसून तो दुसऱ्या कसोटी सामन्याला देखील मुकण्याची शक्यता दाट आहे.
कसोटी मालिकेपूर्वी भारत A आणि ऑस्ट्रेलिया A संघात तीन दिवसीय सराव सामना झाला होता. या सामन्यादरम्यान फलंदाजी करत असताना चेंडू डोक्यावर आदळल्याने पुकोस्कीला दुखापत झाली होती. कनकशन प्रोटोकॉलमुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता.
पुकोस्की दुसऱ्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल अशी सर्वांना खात्री होती, मात्र तो दुसऱ्या सामन्यातून देखील बाहेर होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे त्याचे कसोटी पदार्पण देखील लांबत आहे.
यापूर्वीच सलामीवीर डेव्हिड वॉर्नर वनडे मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने टी-20 मालिकेतून व पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघासाठी ही बाब आणखीनच चिंतेची आहे.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1- 0 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील निराशेला दूर करून पुन्हा नव्या जोशाने भारतीय संघ मैदानात उतरेल अशी सर्वांची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहली आणि पृथ्वी शॉ ऐवजी ‘या’ दोन खेळाडूंना मिळावी टीम इंडियात संधी, दिग्गजाची मागणी
‘विरुष्का’च्या पहिल्या भेटीचा रोमांचक किस्सा, पाहा कुठे आणि कसे जुळले नाते
व्हिडिओ: तूला मानलं पाहिजे भावा! ‘या’ ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने अवघ्या १५ चेंडूत ठोकले अर्धशतक
ट्रेंडिंग लेख –
मराठीत माहिती- क्रिकेटर के श्रीकांत
तीन भारतीय शिलेदार ज्यांनी कसोटीत सर्वात कमी डावात केल्या १००० धावा पूर्ण






