---Advertisement---

पाकिस्तान दौऱ्यावर एकटे नाही जाणार ऑस्ट्रेलियन खेळाडू, जाणून घ्या कोण असेल सोबत

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 6:58 PM
Australia
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर (Australia tour of Pakistan) रवाना होणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख टॉड ग्रीनबर्गने (Todd Greenberg) ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना आश्वासन दिले आहे की, जसे दौऱ्यावर जाण्याची अनुमती मिळाली तर, ते स्वतः खेळाडूंसह पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच जर एक किंवा दोन खेळाडूंनी या दौऱ्यावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर ते खेळाडूंच्या निर्णयाचे स्वागत करतील. जर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला. तर हा १९९८ नंतर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच पाकिस्तान दौरा असेल.

टॉड ग्रीनबर्ग यांनी ‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ला म्हटले की, “मी खेळाडूंना आश्वासन दिले आहे की, ते एकटे जाणार नाही. जर ते  (ऑस्ट्रेलियन खेळाडू) पाकिस्तान दौऱ्यावर गेले, तर मी देखील त्यांच्यासोबत पाकिस्तान दौऱ्यावर जाईल. मला वाटते की, हे खूप महत्त्वाचे असेल. आता खेळाडूंना हे दाखवण्याची उत्तम संधी आहे की, या परिस्थितीत आम्ही एकजूट आहोत.”

हे नक्की पाहा :

तसेच ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तान दौऱ्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत गेल्या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानला गेले होते आणि त्यांचे अहवाल अतिशय सकारात्मक आहेत. परंतु आम्ही डीएफएटी आणि इतर सरकारी संस्थांचा सल्ला घेत राहू, कारण आम्हाला केवळ खेळाडूच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचेही समाधान करायचे आहे की हा एक सुरक्षित दौरा आहे.”

ज्यावेळी २००९ मध्ये श्रीलंका संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवादी संघटनांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर सर्व संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

जाणून घ्या : आयसीसीने डिसेंबरमध्ये एकाही महिला क्रिकेटपटूला ‘प्लेअर ऑफ दि मंथ’ पुरस्काराने का गौरवले नाही?

श्रेयस भूषवणार आयपीएल विजेत्या संघाचे कर्णधारपद? कोट्यवधींची बोली लावण्यासाठी फ्रॅंचाईजी तयार

केपटाऊन कसोटीत नाणेफेक जिंकत विराट ‘टॉस का बॉस’च्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---