भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये ऐतिहासिक दिवस रात्र कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला होता. सामन्यातील पहिल्या डावात स्म्रीती मंधानाने तुफानी शतक झळकावले आहे. त्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी (२ ऑक्टोबर) ३७७ धावांवर डाव घोषित केला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिसा पेरी हीने पूजा वस्त्राकरला बाद करत एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
पूजा वस्त्राकर १३ धावांवर फलंदाजी करत असताना एलिसा पेरीने तिला बेथ मुनीच्या हातून झेलबाद करून माघारी धाडले होते. पूजा वस्त्राकरला बाद करताच एलिसा पेरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा आणि ३०० गडी बाद करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या डावात एलिसा पेरीने २७ षटक गोलंदाजी केली, ज्यामध्ये तिने ७६ धावा खर्च करत २ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या पुरुष आणि महिला संघामध्ये असा कारनामा यापूर्वी कोणालाच करता आला नाहीये. ती ३०० गडी बाद करणारी आणि ५००० धावा करणारी एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे.
याबरोबर एलिसा पेरी महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी भारतीय संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आहे. तिने आतापर्यंत एकूण ३३७ गडी बाद केले आहेत. तर दुसऱ्या स्थानी कॅथरीन ब्रंट आहे, जिने आतापर्यंत एकूण ३०१ गडी बाद केले आहेत. सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी येण्यासाठी एलिसा पेरी फक्त एक पाऊल दूर आहे.
THERE IT IS 💫
Congratulations to Ellyse Perry for taking 300 international wickets! #AUSvIND pic.twitter.com/pxUiXmUjbe
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) October 2, 2021
तर सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने डाव ३७७ धावांवर घोषित केला आहे. या डावात भारतीय संघाकडून स्म्रीती मंधानाने सर्वाधिक १२७ धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्माने देखील ६६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शतकवीर स्म्रीतीच्या ‘त्या’ दिलखेचक फोटोवर भारतीय खेळाडूही फिदा; म्हणाली, ‘ओ हसीना जुल्फो वाली’
जेव्हा अश्विनला तसा जल्लोष केल्याने खावे लागले होते धोनीचे बोलणे, सेहवागने सांगितला जुना किस्सा