ऑस्ट्रेलियाला रविवारी (6 डिसेंबर) भारताविरुद्ध सिडनी येथे झालेल्या टी20 मालिकेच्या दुसर्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताने या मालिकेत 2-0 अशा फरकाने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला आपल्याच मायभूमीत टी-20 मालिका पराभूत होण्याची नामुष्की ओढवली आहे.
ऑस्ट्रेलिया संघ कर्णधार ऍरॉन फिंच आणि आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत दुसर्या सामन्यात सिडनी मैदानावर उतरला होता. दुखापतीमुळे वॉर्नर या मालिकेतून आधीच बाहेर पडला आहे. त्याचबरोबर दुसर्या सामन्यात फिंच खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याने त्याचा संघात समावेश नव्हता.
ऍरॉन फिंचच्या अनुपस्थितीत संघाच्या नेतृत्त्वाची टोपी स्टीव्ह स्मिथकडे जाईल अशी अपेक्षा सर्व चाहत्यांना होती. मात्र, तसे नाही झाले. परंतु जेव्हा नाणेफेकीसाठी मॅथ्यू वेड हा मैदानावर आला, तेव्हा सर्वजण अवाक् झाले. कारण संघात मर्यादित षटकातील संघाचा उपकर्णधार पॅट कमिन्सला मालिकेसाठी आराम दिला आहे. त्यामुळे यष्टीरक्षक मॅथ्यू वेड नाणेफेकीसाठी आला होता.
या सामन्यात सर्व चाहत्यांना एकच प्रश्न पडला होता की, संघामध्ये स्टीव्ह स्मिथ माजी कर्णधार असून त्याला का नाही संधी दिली. त्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगरने शेवटी फॉक्स स्पोर्ट्ससोबत बोलताना या प्रश्नाचे उत्तर दिले.
लॅंगरने खुलासा केला की स्टीव्ह स्मिथला अधिकार्यांच्या भूमिकेसाठी मानले गेले होते, परंतु मागील काही सामन्यात त्याने शानदार कामगिरी केली आहे. परंतु त्याला पुन्हा नेतृत्त्व देण्यासाठी एका निश्चित प्रक्रियेचे पालन करण्याची आवश्यकता आहे. मुख्य प्रशिक्षक हेही म्हणाले की स्मिथ सध्या कर्णधार पदाशिवाय एका महान नेत्याचे चरित्र दाखवत आहे.
फॉक्स स्पोर्ट्ससोबत बोलताना लॅंगर म्हणाले, “मॅथ्यू वेड हा उपकर्णधार होता, तर स्मिथने मागील काळात शानदार कामगिरी केली आहे. जोपर्यंत तो पुन्हा एकदा कर्णधार होत नाही, तोपर्यंत अशीच प्रक्रिया राहील. तो सध्या कर्णधार नसतानाही नेतृत्त्वाच्या सर्व काही योग्य गोष्टी करत आहे.”
विशेष म्हणजे 2018 साली वॉर्नर आणि स्मिथ चेंडू छेडछाड प्रकरणात एक वर्षासाठी संघातून बाहेर होते. त्यांच्यावर एक वर्ष निर्बंध लावण्यात आले होते. त्याचबरोबर स्मिथला कर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्ष नेतृत्त्व न करण्याचे निर्बंध लावण्यात आले. हा निर्बंधाचा कालावधी मार्च 2020 मध्ये समाप्त झाला आहे. परंतु ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्यावर अजून विचार केला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
स्टिव्ह वॉ यांच्या २१ वर्षीय मुलाने घेतला क्रिकेटमधून ब्रेक; भारताविरुद्ध खेळला होता सामना
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग