दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. या दोन्ही संघामध्ये सध्या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) येथे सुरू असलेल्या या कसोटीचा आज (बुधवार, 4 जानेवारी) पहिलाच दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावादरम्यान मार्नस लॅब्यूशेन याने हेल्मेटकडे पाहून नंतर सिगारेट पिण्याचा इशारा केला. त्याच्या या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
झाले असे की, सामन्याच्या 14 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेकवेळी मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) याने त्याच्या हेल्मेटमधील प्लास्टिक सेट करण्यासाठी लायटर मागितले. यामुळे त्याने त्याच्या तंबूकडे सिगारेट पिण्याचा इशारा केला. क्रिकेट डॉट कॉम एयू यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Labuschagne asking for Lighter for some repair work in helmet. pic.twitter.com/ueJsfOynRC
— Johns. (@CricCrazyJohns) January 4, 2023
या डावात ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट 12 धावसंख्येवरच गमावली. मागील सामन्याचा द्विशतकवीर डेविड वॉर्नर 11 चेंडूत 10 धावा करता बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा याने लॅब्यूशेनच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 261 चेंडूत 135 धावांची भागीदारी केली. लॅब्यूशेन 79 धावा करत बाद झाला. त्याने ही खेळी 151 चेंडूत 13 चौकार मारत केली. त्याला एन्रिच नोर्किया याने काइल व्हेरेने याच्याकरवी झेलबाद केले.
लॅब्यूशेनने आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळले असून त्यातील हे 14वे अर्धशतक ठरले. तर सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील चौथे अर्धशतक ठरले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काहीवेळ थांबवला गेला. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 2 विकेट्स गमावत 147 धावा केल्या. ख्वाजा 54 धावा करत खेळपट्टीवर आहे, तर स्टिव्ह स्मिथ नुकताच फलंदाजीला आला आहे.
या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. यातील पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला, तर दुसरा सामना एक डाव आणि 182 धावांनी जिंकला होता. कसोटी मालिकेतनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.
( AUSvSA 3rd test Marnus Labuschagne’s gesture of smoking cigarette video goes viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी या संघाला संकटात…’, शेवटचे षटक अक्षरला देण्यामागचे कारण हार्दिकने केले स्पष्ट
VIDEO: उमरानच्या रॉकेटगतीने बुमराहचा विक्रम मोडीत, श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करत फिरवला सामना