मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकात 230 धावांवर संपूष्टात आला आहे.
भारताकडून फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 10 षटकात 42 धावा देत 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 6 विकेट्स घेणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
याआधी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित अगरकरने भारताकडून ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या.
विशेष म्हणजे अगरकरनेही हा पराक्रम ऑस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारी महिन्यात 2004 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर केला असून त्यानेही या सामन्यात 42 धावांतच 6 विकेट्स घेतल्या होत्या.
चहल हा ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा भारताचा एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी रवी शास्त्री आणि अगरकरने असा पराक्रम केला आहे. शास्त्रींनी 8 डिसेंबर 1991 ला पर्थमध्ये 15 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–…आणि युजवेंद्र चहलने गुरजी रवी शास्त्रींचा २८ वर्षे जूना विक्रम मोडला
–इंग्लंड, श्रीलंकेप्रमाणेच ऑस्ट्रेलिया विरुद्धही धोनीने केला तो मोठा कारनामा
–भारताकडून आज वनडे पदार्पण करणारा कोण आहे विजय शंकर…