---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजाचा साधारण झेल बुमराहकडून ‘मिस’, व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 1:48 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सामना ऍडलेड येथे सुरू झाला आहे. यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान भारताने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीस उतरला. यावेळी भारतीय संघ क्षेत्ररक्षणात चुका करताना दिसला. बाऊंड्री लाईनवर उभा असलेल्या जसप्रीत बुमराहने विरुद्ध संघाच्या धडाकेबाजचा महत्त्वपूर्ण झेल सोडला.

झाले असे की, भारताकडून १८ वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मार्नस लॅब्यूशाने फलंदाजी करत होता. पहिले तीन चेंडू शमीने निर्धाव टाकले. त्यानंतर त्याने पुढच्या दोन चेंडूवर २ धावा दिल्या. यानंतर शेवटचा चेंडू त्याने टाकला असता, लॅब्यूशानेने जोरदार फटका मारला. हा चेंडू बाऊंड्रीच्या दिशेने जात होता. तिथे बुमराह क्षेत्ररक्षण करत होता.

असे वाटत होते की, हा चेंडू बुमराह सहजरीत्या झेलेल. परंतु त्याने उडी मारूनही हा चेंडू झेलला नाही. आणि चौकार गेला. त्यामुळे लॅब्यूशानेला जीवदान मिळाले. जर लॅब्यूशाने बाद झाला असता, तर भारताला मोठी विकेट मिळाली असती. त्यावेळी तो १२ धावांवर खेळत होता.

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ३४ व्या षटकापर्यंत ११ षटके गोलंदाजी करताना १३ धावा देत २ विकेट्सची कमाई केली आहे. यामध्ये त्याने मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना पायचीत करत तंबूत धाडले.

महत्त्वाच्या बातम्या-

आई शप्पथ..!! एकाच ओव्हरमध्ये पाच विकेट्स, पाहा कुठे आणि कोणी केलाय पराक्रम

डेविड वॉर्नरचा हृतिक रोशनच्या अवतारातील ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच…!! तुम्हीही रोखू शकणार नाही हसू

भारताला चौथा धक्का! अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे कर्णधार विराट कोहली रन आऊट?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---