---Advertisement---

मार्नस लॅब्युशेनची कमाल! विंडीजविरुद्ध धावांचा पाऊस पाडताच झाला गावसकर, लारा यांच्या यादीत सामील

Marnus Labuschagne
---Advertisement---

एकीकडे पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला इंग्लंड धावांचा पाऊस पाडत असताना, दुसरीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आलेल्या वेस्ट इंडिज संघालादेखील यजमानांनी चांगलेच धुतले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात असून शनिवारी (3 डिसेंबर) या सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ खेळण्यात आला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेन याने शतकांची रांग लावताना मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात द्विशतकी आणि दुसऱ्या डावात नाबाद शतकी खेळी केली. यामुळे एकाच कसोटी सामन्यात शतक आणि द्विशतक करणारा तो जगातील केवळ आठवाच फलंदाज ठरला. त्याच्याआधी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाचे डग वॉल्टर्स, भारताचे सुनील गावसकर, वेस्ट इंडिजचे लॉरेन्स रो, ऑस्ट्रेलियाचे ग्रेग चॅपल, इंग्लंडचे ग्रॅहम गूच, वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा आणि श्रीलंकेचे कुमार संगाकारा यांनी केली आहेत.

https://twitter.com/ICC/status/1598894622973243392?s=20&t=N7UK2DnZMliM8E665RjZgA

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्नस लॅब्युशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी द्विशतकी खेळी करत संघाचा पहिला डाव 600 च्या जवळपास नेला. यावेळी स्मिथने नाबाद 200 आणि लॅब्युशेनने 204 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 4 बाद 598 धावसंख्येवर घोषित केला.

वेस्ट इंडिजचे पहिल्या डावात 283 च धावसंख्या उभारली. यामध्ये सलामीवीर आणि कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने सर्वाधिक 64 आणि तेजनारायण चंद्रपॉल याने 51 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 विकेट्स गमावत 182 धावा केल्या. त्यामध्ये लॅब्युशेनने नाबाद 104 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 498 धावांचे लक्ष दिले. Marnus Labuschagne became only the eighth batsman in the world to score a century and a double century in a single Test match

एकाच कसोटीत द्विशतक आणि शतकी खेळी करणारे:(Double Centuries and Centuries in the same Test)
1969 मध्ये डग वॉल्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज
1971 मध्ये सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज
1972 मध्ये लॉरेन्स रो विरुद्ध न्यूझीलंड
1974 मध्ये ग्रेग चॅपल विरुद्ध न्यूझीलंड
1990 मध्ये ग्रॅहम गूच विरुद्ध भारत
2001 मध्ये ब्रायन लारा विरुद्ध श्रीलंका
2014 मध्ये कुमार संगकारा विरुद्ध बांगलादेश
2022 मध्ये मार्नस लॅबुशेन विरुद्ध वेस्ट इंडिज

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे अस कुठं असतंय व्हय? चेंडू चमकवण्यासाठी रुटने लढवली अनोखी शक्कल, सहकाऱ्याच्या डोक्याचा केला वापर
रावळपिंडीत विक्रमांची रांग! कसोटीच्या इतिहासात चारही सलामीवीरांनी रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---