भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये ३० सप्टेंबरपासून दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर भारतीय संघाने त्यांचा पहिला डाव घोषित केला आहे. भारतीय संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर ३७७ धावा करून डाव घोषित केला आहे. भारतीय संघाच्या या धावसंख्येत सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने सर्वाधिक १२७ धावा केल्या आहेत. तसेच दीप्ति शर्मानेही ६६ धावांची महत्वाची खेळी केली आहे.
सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी या दोघींनी ९३ धावांची भागीदारी केली. शेफाली वर्मा ३१ धावा करून तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मैदानात टिकून राहिली आणि दुसऱ्या दिवशी तिचे शतक पूर्ण केले. स्मृतीने २२ चौकार आणि एका षटकराच्या मदतीने १२७ धावांचा आकडा गाठला. तसेच दीप्ति शर्माने १६७ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावा फटकावल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरी, स्टेला कॅपबेल आणि सोफी मोलिनेक्य यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. तसेच एश्ले गार्डनरने १ विकेट घेतला.
तिसऱ्या दिवशीचा असा राहिला खेळ
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी २७६ धावांपासून खेळाला सुरुवात केली होती. दिप्ती शर्माने तिच्या डावाची सुरुवात १२ धावांनी आणि तानिया भाटियाने तिच्या डावाची सुरुवात शून्य धावांनी केली होती. मैदानात खेळताना दोघीही चांगल्या लयीत दिसत होत्या. पण कॅपबेलने तानियाला बाद केले आणि त्यांची जोडी फोडली. तानियाने ७५ चेंडूंचा सामना केला आणि ३ चौकारांच्या मदतीने २२ धावा करू शकली.
तानियानंतर पूजा वस्त्राकरने ४८ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने १३ धावा केल्या आणि तीदेखील बाद झाली. दीप्तिने अर्धशतक केल्यानंतर तिही जास्तवेळ मैदानात टिकू शकली नाही आणि विकेट गमावली. दीप्ति बाद झाल्यानंतर काही वेळाने भारतीय संघाने त्यांच्या डाव घोषित केला. भारताच्या झूलन गोस्वामी आणि मेघना सिंग या दोघी नाबाद राहिल्या आहेत.
That's Stumps on Day 3 of the #AUSvIND Pink-Ball Test in Carrara!
2⃣ wickets each for @JhulanG10 & @Vastrakarp25 👍 👍
Australia move to 143/4 & trail #TeamIndia by 234 runs.
Join us tomorrow for an exciting Day 4 🙌
Scorecard 👉 https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/oUgK5rILKK
— BCCI Women (@BCCIWomen) October 2, 2021
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीतही बॅकफूटवर पडला आहे. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेर ६० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर १४३ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी केवळ ४ धावांवर बाद झाली. तिच्यानंतर दुसरी सलामीवीर एलिसा हेली अवघ्या २९ धावा करु शकली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग हीसुद्धा ३८ धावांवर पल्हेलियनला परतली. तिसऱ्या दिवसाअंती भारतीय संघाला ताहलिया मॅकग्राथच्या (२८ धावा) रुपात चौथी विकेट घेण्यात यश आहे.
ऑस्ट्रेलियाकडून एलिसा पेरी आणि एश्लिग गार्डनर नाबाद राहिल्या. ऑस्ट्रेलिया संघ अजून भारतापेक्षा २३४ धावांनी मागे आहे. भारताच्या झुलन गोस्वामी आणि पुजा वस्त्राकारने तिसऱ्या दिवशी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजाला बाद करत एलिसा पेरीने रचला इतिहास, ‘हा’ अष्टपैलू विक्रम करणारी पहिलीच ऑसी क्रिकेटर
शतकवीर स्म्रीतीच्या ‘त्या’ दिलखेचक फोटोवर भारतीय खेळाडूही फिदा; म्हणाली, ‘ओ हसीना जुल्फो वाली’