पुणे, 5 फेब्रुवारी 2024: इंटेंसिटी टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अवधुत निलाखे, पियुश रेड्डी यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अवधूत निलाखे याने चौथ्या मानांकित आर्यन बॅनर्जीचा 6-3, 6-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. क्वालिफायर पियुश रेड्डी याने आठव्या मानांकित श्री चरना समिनेनीचा 6-4, 3-6, 7-5 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. शौर्य गडदे याने विराज खानविलकरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चुरशीच्या लढतीत क्वालिफायर आदिनाथ कचरेने अहान भट्टाचार्यचा 6-2, 3-6, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुलींच्या गटात पहिल्या फेरीत कनिष्का नारुकाने गार्गी भडकमकरचा 6-3, 6-3 असा तर, रिशीता यादवने सान्वी लाटेचा 6-0, 6-1 असा सहज पराभव केला. क्वालिफायर चाहत ठाकूर हिने स्वानिका ढमालेवर 6-1, 6-4 असा विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अतुल देवधरे, कपिल किन्नरी, सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: पहिली फेरी: मुले:
आरव बेले(1)वि.वि.आयुष देऊस्कर 6-1, 6-0;
रेयांश गुंड वि.वि.क्रेशिव शर्मा 6-3, 6-4;
पियुश रेड्डी वि.वि.श्री चरना समिनेनी(8) 6-4, 3-6, 7-5;
अवधूत निलाखे वि.वि.आर्यन बॅनर्जी (4) 6-3, 6-4;
शौर्य गडदे वि.वि.विराज खानविलकर 6-2, 6-3;
अभिनव शर्मा वि.वि.अहान जैन 6-2, 6-1;
लक्ष्य त्रिपाठी(7) वि.वि.आयुष मिश्रा 6-0, 6-2;
आदिनाथ कचरे वि.वि.अहान भट्टाचार्य 6-2, 3-6, 6-2;
अद्वैत गुंड(6) वि.वि.इथन लाहोटी 6-2, 6-0;
मुली:
कनिष्का नारुका वि.वि.गार्गी भडकमकर 6-3, 6-3;
रिशीता यादव वि.वि.सान्वी लाटे 6-0, 6-1;
चाहत ठाकूर वि.वि.स्वानिका ढमाले 6-1, 6-4;
महत्वाच्या बातम्या –
WTC Point Table । गुणतालिकेत भारताची बंपर लॉटरी! इंग्लंडला चिरडून मिळवले ‘हे’ स्थान
IND vs ENG । इंग्लंडच्या पराभवानंतर यॉर्करबाबत बोलला बुमराह, रोहित शर्माचाही केला उल्लेख