इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. नुकतीच भारतीय संघात निवड झालेला मात्र एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या वेगवान गोलंदाज आवेश खान याने इतिहास रचला.
Fast bowler @Avesh_6 is SOLD to @LucknowIPL for INR 10 crore 👏💰#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
आवेश खानवर लागली ऐतिहासिक बोली
आयपीएल २०२१ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आवेश खानवर ऐतिहासिक बोली लागली. तब्बल १० कोटी रुपयांमध्ये आयपीएलमधील नवा संघ लखनऊ सुपरजायंट्सने त्याला आपल्या संघात सामील केले. याचबरोबर तो आयपीएल इतिहासात एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला.
‘धडाकेबाज’ अभिषेकसाठी पंजाब-हैदराबादमध्ये रंगली चुरस; अखेर मोठ्या रकमेसह…
राहुल नाम तो सुना होगा! ९ कोटींची घसघशीत कमाई करत तेवतिया बनला ‘या’ संघाचा भाग
चार-चार संघ ज्याच्या मागे धावले ‘तो’ अभिनव सदारंगाणी कोण आहे?