आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत अनेक शानदार झेल पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी (16 एप्रिल) खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खाननं असाच एक अप्रतिम झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर तो स्वतःही आश्चर्यचकित झाला होता. आवेश खाननं स्वत:च्याच गोलंदाजीत अतिशय अवघड झेल घेतला आणि केकेआरचा सलामावीर फिल सॉल्टला 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं.
आवेश खाननं कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील चौथ्या षटकात हा झेल घेतला. तो त्याच्या स्पेलचं दुसरं षटक टाकण्यासाठी आला होता. षटकातील पहिल्या 2 चेंडूत फक्त 1 धाव आली. तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना फिल सॉल्टला चेंडू योग्य टायमिंगनं मारता आला नाही. चेंडू आवेश खानच्या दिशेनं गेला, ज्यानं डाव्या बाजूला डाईव्ह मारून एका हातात शानदार झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून मैदानात उपस्थित सहकारी खेळाडूही थक्क झाले.
या आधी राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात आवेश खान आणि विकेटकीपर संजू सॅमसन कॅच घेण्यासाठी एकत्र आले होते. त्याच्यातील गोंधळात हा कॅच सोडला गेला होता. आता सॉल्टचा झेल घेतल्यानंतर आवेश खाननं चेष्टेनं सॅमसनकडे बोट दाखवलं.
A brilliant Caught & bowled from Avesh Khan. 💯pic.twitter.com/ZmbiRmOaSO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 16, 2024
या सामन्यात फिल सॉल्ट डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच जवळजवळ आऊट झाला होता. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॉल्टनं शॉट मारला आणि चेंडू सरळ रियान परागच्या दिशेनं गेला. झेल अत्यंत सोपा होता, मात्र परागची रिव्हर्स कप कॅच पकडण्याची शैली त्याला महागात पडली. त्याच्या हातातून हा सोपा झेल निसटला गेला. मात्र राजस्थानासाठी चांगली बाब म्हणजे, परागची ही चुकी जास्त महागात पडली नाही. सॉल्ट केवळ 10 धावा करून बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
सुनील नारायणनं ठोकलं कारकिर्दीतील पहिलं शतक! आयपीएलमध्ये रचला अनोखा रेकॉर्ड
राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसनची 10 वर्ष पूर्ण, विशेष व्हिडिओमध्ये पराग-चहलनं दिली मोठी प्रतिक्रिया