राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं फ्रँचायझीसाठी आयपीएलमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्तानं राजस्थाननं एक खास व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये संघाचा सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू आपल्या कर्णधाराचं कौतुक करताना दिसत आहेत.
राजस्थान रॉयल्सनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य संजू सॅमसनचं कौतुक करताना दिसतात. सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य म्हणतात, “जेव्हा मी यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला माझं बॅटन पास करत होतो तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी त्याला सांगितलं की मी तुला हे विकेट-कीपिंग ग्लोव्हज देत आहे, जेणेकरुन तू इथून फ्रँचायझीला उच्च पातळीवर नेऊ शकशील. मला पूर्ण विश्वास आहे की तू एक दिवस भारतासाठीही खेळशील.”
यावेळी राजस्थानचा फलंदाज रियान परागनंही संजू सॅमसनचं कौतुक केलं. पराग म्हणाला, “संजू भैया सोबत मला 6 वर्ष झाली. तो मैदानाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी निर्णय घेतो. तो नेहमीच नेतृत्व गटाचा एक भाग असतो. तो असा कर्णधार आहे, ज्याच्यासाठी मला सामने जिंकायचे आहेत. आम्हाला मिळालेला तो सर्वोत्तम कर्णधार आहे. राजस्थान रॉयल्ससोबतचा माझा जसा प्रवास राहिला, तसाच त्याचाही होता. जेव्हाही चढ-उतार येतो, तेव्हा तो माझ्यासाठी नेहमीच उभा असतो. मला त्याला नेहमीच आनंदी बघायचं आहे.”
संजू सॅमसनबद्दल बोलताना फिरकीपटू युजवेंद्र चहल म्हणाला, “आयपीएलमध्ये चढ-उतार होतच असतात. तुम्ही जिंकायचं की हरायचं, हे सर्वस्वी कर्णधारावर अवलंबून असतं. विशेषत: जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा त्याची सर्व जबाबदारी कर्णधारावर असते. तो खूप रिलॅक्स असतो आणि शांततेनं गोष्टी समजून घेतो.”
“He is a captain whom I want to win games for. That’s the best captain”
This one’s for you, Sanju Samson. 💗 pic.twitter.com/T1EB1yoHXj
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 16, 2024
संजू सॅमसन आयपीएलच्या या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं आतापर्यंत तीन अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच राजस्थान रॉयल्सही चांगली कामगिरी करत आहेत. संघ 6 सामन्यांमध्ये 5 विजयानंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएल मधून घेतला ब्रेक, मानसिक थकव्यामुळे हवी विश्रांती
“आरसीबीला विकून टाका…”, सततच्या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटूचा संताप; बीसीसीआयला दिला अजब सल्ला