---Advertisement---

आवेशच्या यशाचे ‘मलिंगा कनेक्शन’

On: गुरूवार, सप्टेंबर 30, 2021 7:41 PM
avesh-khan
---Advertisement---

सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा उत्तरार्ध खेळला जात आहे. या उत्तरार्धात आत्तापर्यंत युवा भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय. यापैकी दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा युवा वेगवान गोलंदाज आवेश खान हा स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या यशाचे रहस्य सांगितले.

असा सराव करतो आवेश
आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये १८ बळी घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पटेलला आव्हान देत आहे. त्याने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या यशाचे रहस्य सांगितले. तो म्हणाला,
“मी सराव करताना नेहमीच यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. १०-१२ अचूक यॉर्कर टाकल्यानंतर काहीशी परिपूर्णता आल्यासारखे वाटते. यासाठी मी बूट आणि बाटल्या ठेवून सराव करतो. यामुळे माझा आत्मविश्वास दुणावतो.” श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याप्रकारेच सराव करत असत.

दिल्लीसाठी खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए याने काही दिवसांपूर्वीच आवेशचे कौतुक करताना म्हटले होते की, त्याच्याकडे अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे व त्याने या गोष्टीवर काम करायला हवे.

नॉर्किए व रबाडाकडून खूप काही शिकलो
आवेशने या मुलाखतीत दिल्ली संघातील आपले दक्षिण आफ्रिकेचे सहकारी कगिसो रबाडा व एन्रिक नॉर्किए यांचे आभार मानले. तो म्हणाला,
“रबाडा व नॉर्किए यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळाले. त्यांनी पहिले षटक टाकल्यानंतर मी अनेकदा त्यांच्यापाशी जातो व खेळपट्टी कशी आहे याबाबत विचारणा करतो. ते मला कुठे चेंडू टाकायचे याबाबत मार्गदर्शन करत असतात. मैदानावर आमची अनेक वेळा चर्चा होत असते. एक गट म्हणून आम्ही आणखी प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.”
आवेश खानने या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळताना १८ बळी मिळवले आहेत. तो २०१८ पासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---