---Advertisement---

आयपीएल स्पर्धेने उघडले नशिबाचे दार; ‘या’ दोन खेळाडूंची होऊ शकते टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात एन्ट्री

On: मंगळवार, ऑक्टोबर 12, 2021 9:24 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याची नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे की, आयपीएल स्पर्धा खेळत असलेल्या आणखी दोन खेळाडूंना यूएईमध्ये थांबण्यास सांगितले आहे.

आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खान आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरला आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी बॅकअप म्हणून यूएईमध्ये थांबायला सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देत निवड समितीच्या जवळच्या बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला म्हटले की, “निवडकर्त्यांनी आवेशला ही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्याला नेट गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात येणार आहे. परंतु जर संघ व्यवस्थापकांना वाटले तर, तो मुख्य संघात देखील स्थान मिळवू शकतो.” आवेश खानने आयपीएल २०२० आणि २०२१ स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी केली.

तसेच सूत्राने पुढे म्हटले की, “आवेश १४२-१४५ च्या गतीने गोलंदाजी करतो. सपाट खेळपट्टीवर त्याला चांगला बाऊन्स मिळतो. स्टाफ सदस्यातील काही सदस्यांचे लक्ष त्याच्यावर आहे.” आवेश खानची इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या कसोटी संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. परंतु, सराव सामन्यात त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला माघारी परतावे लागले होते.

तसेच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाज म्हणून खेळताना दिसून येऊ शकतो. कारण तो गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाहीये. अशी माहिती समोर येत आहे की, हार्दिक पंड्याचा बॅकअप खेळाडू म्हणून केकेआरचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरची निवड होऊ शकते. व्यंकटेश अय्यरने ८ सामन्यात ३८ च्या सरासरीने २६५ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ३ गडी देखील बाद केले आहेत.

महत्त्वात्या बातम्या – 

आयपीएल २०२१ मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश; म्हणाला…

पराभवानंतर कर्णधार कोहली झाला भावुक, आरसीबीचा ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल

राशिद खानने सांगितली जागातील टॉप-५ टी२० क्रिकेटपटूंची नावे, ‘या’ दोन भारतीयांचा केला समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---