पॅरिस ऑलिम्पिकचा आज (5 ऑगस्ट) 10वा दिवस आहेत. आतापर्यंत 9 दिवसांत भारताला केवळ 3 पदकं मिळाली आहे. आज पुन्हा भारतीय खेळाडू पदक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील.
अखेर 5 ऑगस्टपासून कुस्तीचे सामने सुरू होणार आहेत. निशा दहिया ही पदकाची दावेदार आहे. ती आजच उपांत्य फेरीत स्थान निश्चित करू शकते. काल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला. आता त्याला कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. यासाठी त्याला मलेशियाच्या झी जिया लीचा पराभव करावा लागेल. हा सामना संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.
ॲथलेटिक्समध्ये किरण पहल 400 मीटरच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. तसेच राष्ट्रीय विक्रम धारक आणि 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये भाग घेणार आहे. मनिका बत्रा आणि इतर महिला खेळाडू टेबल टेनिसमध्ये पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसतील. मनिका आता महिला सांघिक स्पर्धेत भाग घेणार आहे. तसेच शूटिंगमध्ये मिश्र स्कीट संघासाठी पात्रता फेरी असेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं आजचं (5 ऑगस्ट) वेळापत्रक
शूटिंग
मिश्र स्कीट संघ पात्रता फेरी – माहेश्वरी चौहान आणि अनंत जीत सिंग – दुपारी 12:30
टेबल टेनिस
मनिका बत्रा/श्रीजा अकुला/अर्चना कामत विरुद्ध रोमानिया – महिला संघ टेबल टेनिस – दुपारी 1:30
नौकानयन
नेत्रा कुमनन महिला सेलिंग डिंगी शर्यत 9 आणि 10 – दुपारी 3:35
विष्णू सरवणन पुरुष सेलिंग डिंगी शर्यत 9 आणि 10 – सायंकाळी 6:10
बॅडमिंटन
लक्ष्य सेन विरुद्ध झी जिया ली – पुरुष एकेरी कांस्यपदक सामना – सायंकाळी 6
कुस्ती
निशा दहिया विरुद्ध सोवा रिझको टेटियाना – महिलांची 68 किलो फ्रीस्टाइल कुस्ती – सायंकाळी 6:30
जर निशा दहिया उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली तर तो सामना सायंकाळी 7.50 वाजता होईल.
ॲथलेटिक्स
किरण पहल – महिलांची 400 मीटर फेरी 1 – दुपारी 3:25
अविनाश साबळे – पुरुषांची 3000 मीटर स्टीपल चेस पहिली फेरी – रात्री 10:34
हेही वाचा –
सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेन पराभूत, आता कांस्य पदकासाठी झुंज देणार
यामुळे झाला पराभव, भारताच्या श्रीलंकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवामागची 3 प्रमुख कारणं
खेलिफआधी ‘या’ भारतीय महिला ॲथलिट्सवरही लागलाय पुरुष असण्याचा आरोप






