क्रिकेटपटूंबाबत एक गोष्ट कायम म्हटली जाते की, क्रिकेटपटू हे जास्त शिक्षण घेत नाही. क्रिकेटविश्वातील आजवरचा सर्वात चांगला खेळाडू म्हटला गेलेला सचिन कमी शिकलेला आहे अशी उदाहरणे अनेकांना दिली जातात. सध्या भारतीय संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली याचेदेखील १२ वी पर्यंतच शिक्षण झाले आहे.
असे असले तरी काही भारतीय क्रिकेटपटू याला अपवाद आहेत. भारतीय संघाचा संकटमोचक म्हटला गेलेला व्हीव्हीएस लक्ष्मण याने वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. तर, राहुल द्रविड व अनिल कुंबळे यांनी अनुक्रमे व्यवस्थापन व अभियांत्रिकी पदव्या मिळवल्या आहेत. याव्यतिरिक्त सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंच शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. मात्र, आज आपण भारतीय क्रिकेटमधील सर्वात शिक्षित खेळाडूविषयी जाणून घेणार आहोत.
हा आहे भारतातील सर्वात उच्चशिक्षित क्रिकेटपटू
भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात उच्चशिक्षित क्रिकेटपटू म्हणून अविष्कार साळवी याला ओळखले जाते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अविष्कारने भारतीय संघासाठी ४ वनडे सामने खेळले. ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्याप्रमाणे गोलंदाजीची शैली असलेल्या अविष्कारने ११ एप्रिल २००३ रोजी भारतासाठी बांगलादेश विरुद्ध वनडे सामन्यातून पदार्पण केले. त्याने खेळलेल्या या ४ सामन्यात तो चारच बळी मिळवू शकला.
अविष्कारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ ७ महिन्यांची राहिली. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याने एका हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व देखील केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ६२ सामन्यांत १६९ बळींची नोंद आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये तितकेसे योगदान देऊ न शकलेल्या अविष्कार साळवी याला भारतातील सर्वात उच्चशिक्षित क्रिकेटपटू म्हणण्याचे कारण म्हणजे त्याने ऍस्ट्रोफिजिक्स या विषयात पीएचडी मिळवली आहे. या पदवीच्या जोरावर तो इस्त्रो किंवा नासा यासारख्या अवकाश संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्थांमध्ये नोकरी करू शकला असता.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या ३ सामन्यात ३० विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक; मग सर्वांपुढे भारतीय संघाला केले लाजिरवाणे
‘ईडन गार्डन माझं होम ग्राउंड…’, जिथे बॅट धरायला शिकला, त्याच मैदानाबद्दल काय बोलून गेला साहा
Video: १८८च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारी फलंदाज एका धावेच्या नादात रनआऊट, पाहा तो दुर्देवी क्षण